डॉ. अमित पाळवदे उच्च शिक्षणासाठी मुंबईत

बीड
Spread the love

डॉ. अमित दत्तात्रय पाळवदे यांना पीडीसीईटी 2020 च्या राष्ट्रीय समुपदेशन प्रक्रियेद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे डीएनबी ईएनटी (ओटोर्हाईनोलॅरिंगोलॉजी सुपर स्पेशालिटी) (कान, नाक, घशातील तज्ज्ञ) प्रवेश मिळाला असुन त्यांचा नॅशनल बोर्ड आँल इंडिया रँक हा 64 आहे.
बी.जे. मेडिकल कॉलेज (ससून) पुणे येथे ई.एन.टी. मध्ये डॉ अमितचा ईएनटी डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण झाले असून आता डीएनबी ईएनटी/सुपर स्पेशालिटी साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे ऊच्च शिक्षणासाठी रुजू झाले आहेत.

डॉ. अमित म्हणाले की, माझे यश हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि स्वत: वर असलेल्या विश्वासाचा परिणाम आहे परंतु अनुभवाने आपल्या प्रत्येकाला हे समजते की, ज्यांना आपल्यावर प्रेम आणि काळजी आहे अशा लोकांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि नैतिक समर्थनाशिवाय ते प्रगट होऊ शकत नाही प्रत्येक क्षणाला आपण विराम दिला किंवा मागे एक पाऊल उचलले, त्या प्रत्येक वेळी आपली माणसं आपणास स्थीर व अविचल ठेवत असतात आणि आपल्याला स्वप्नांच्या मागे जात रहाण्याची ऊर्जा देत असतात. अशा लोकांचे आशीर्वाद आणि प्रेम मला मिळाले आहे माझे वडील डॉ. डी.एन. पाळवदे आणि आई अ‍ॅड. सौ.पूनम पाळवदे, बहीण डॉ. रश्मी पाळवदे-केंद्रे (एम.डी.भुलतज्ञ), माझे सर्व गुरुजन, मेडिकल कॉलेज पुणे येथील शिक्षक आणि वरिष्ठ, माझे सहकारी, आप्तेष्ट यांच्या सदिच्छा व सहकार्य यामुळेच मी यश संपादन केले असुन मी निष्चीत सर्वासाठी मी पुढील यश मिळविल असा दृढ विश्वास व्यक्त केला.

डॉ. अमित यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण भेल सेकेंडरी स्कूल परळी वै. जि बीड येथे झाले. दहावीत विषेश प्राविण्यासह प्रथम येण्याचा त्यांने बहुमान मिळवला होता. बारावीचे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर जि. लातूर येथे झाले. बारावीत विभागातून सर्वप्रथम येत राज्यामध्ये 13 वा क्रंमाक पटकावला.
वैद्यकीय पदवी शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई येथे पूर्ण केले तर वैद्यकीय पदविका शिक्षण बी.जे.मेडिकल कॉलेज पुणे (ससून हॉस्पिटल, पुणे) येथे पूर्ण केले. कोरोना पार्श्वभूमीवर कोव्हीड-19 कर्तव्य हे ससुन रुग्नालय येथे अत्यंत समरसतेने पार पाडून कोरोना योद्धा म्हणून ससून हास्पिटलला रुग्णसेवा केली आहे. आणि आता डीएनबी ईएनटी/सुपर स्पेशालिटी साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल मध्य रेल्वे रुग्णालय भायखळा मुंबई येथे रुजू झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *