महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन

बीड
Spread the love

*महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन*

परळी, (प्रतिनिधी):- 72 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे सर्व विद्यार्थ्याकरिता ऑनलाइन विविध स्पर्धेचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आले आहे. ऑनलाईन स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक कसबे के.आर. यांनी केले आहे.

72 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तसेच कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता 5 ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात इयत्ता पाचवीसाठी चित्रकला स्पर्धा (रोकडे सर 907590111)इयत्ता सहावी साठी सुंदर हस्ताक्षर (मराठी किंवा इंग्रजी हस्ताक्षर) शेख सर मो.9420016348, इयत्ता 7 साठी माझे शिक्षक मोबाईल यावर आधारित निबंध स्पर्धा, पटले सर मो.9405373389, इयत्ता आठवी साठी कोरोना काळातील माझी दिनचर्या या विषयावर निबंध गिरी सर मो.9960740202, इयत्ता नववी साठी मोबाइल शाप की वरदान, कुरे सर मो.9421272372, इयत्ता दहावीसाठी व कोरोना व बेरोजगारी या विषयावर ऑनलाइन निबंध देशमुख मो.9423867012 या क्रमांकावर वर पाठवावे. तसेच 5 ते 7 बाल गटासाठी वैयक्तिक देशभक्ती गीतावर दोन मिनिटे नृत्य करतानाचा व्हिडिओ श्री राजमाने सर मो.9421342622 तर 9 ते 10 साठी देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यासाठी बोराडे सर यांच्या मो.9049202918 वर व्हिडीओ पाठवावे.
या स्पर्धांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असून शाळा सुरू होताच विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे व या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव वर्ग तुकडी इयत्ता ठळकपणे नमूद करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *