ना.धनंजय मुंडेच्या आगमानानिमित्त चंदुलाल बियाणी आयोजित अंध कलाकारांच्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

परळी वैजनाथ
Spread the love

ना.धनंजय मुंडेच्या आगमानानिमित्त चंदुलाल बियाणी आयोजित अंध कलाकारांच्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री म्हणून पदभार
स्विकारल्यानंतर ना.धनंजय मुंडे शुक्रवारी परळी आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी व कुटुंबियांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
त्यांच्या स्वागतासाठी परळीतील अंध कलाकारांच्या स्वरगुंजन ऑर्केस्ट्राचे
आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाने उपस्थितांची मने तर जिंकलीच तसेच
ना. धनंजय मुंडे यांनीही काही गाण्यांचा पुर्णपणे उभा राहून आनंदही घेतला. यावेळी
मराठवाडा साथीने प्रकाशित केलेल्या विशेष पुरवणी फ्रेमद्वारे भेट देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी व बियाणी परिवाराच्या
वतीने सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
कुटूंबीयांच्या वतीने भागवत मंगल कार्यालयात स्नेह भोजन व सत्कार कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर ना. मुंडे यांच्या मंत्रालयाशी संलग्न
असलेल्या अंध व अपंग कलाकारांच्या स्वर गुंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते. ऑर्केस्ट्राचे ज्येष्ठ गायक तुकाराम जाधव, दिपीका सावजी, गंगासागर
वाघमारे आदी कलाकारांनी मराठी व हिंदी गीते सादर केली. डोळ्याने अंध असूनही
अत्यंत सफाईदारपणे संगीत व अद्ययावत त्यांची बोटे फिरत होती. काही गायकांनी
तर जुन्या गायकांची आठवण करुन दिली. कृष्णा शिनगारे, अजय सुमासे यांच्या
गीतांनी चांगलेच वातावरण भावपुर्ण झाले होते. ना. धनंजय मुंडे यांच्यावरील एक
गीतही या कलाकारांनी सादर केले होते. दरम्यान, या कार्यक्रमास माजी आमदार
बाबाजानी दुर्राणी, आ. बाळासाहेब आजबे, माजी मंत्री पंडितराव दौंड, राजेश
विटेकर आदींसह अनेकांनी उपस्थिती लावली होती. या सर्वांचे स्वागत बियाणी
परिवाराच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *