ना.धनंजय मुंडे यांच्या विधान परिषदेच्या रिक्त जागी काॕग्रेसचे संजय दौंड यांना उमेदवारी

परळी वैजनाथ
Spread the love

ना.धनंजय मुंडे यांचे विधान परिषद सदस्यत्व रिक्त झाल्याने काॕग्रेसचे संजय दौंड हे राष्ट्रवादी काॕग्रेस कडुन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
काॕग्रेसचे संजय दौंड यांनी विधान सभेत आ.धनंजय मुंडे यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती.त्याच बरोबर वडिल माजी राज्यमंञी पंडितराव दौंड यांनी तर वयाच्या वृध्दपकाळात हि मतदार संघ पिंजुन काढला होता त्याचच बक्षिस म्हणुन राष्ट्रवादी कडुन आ.धनंजय मुंडे यांच्या विधान परिषदेची रिक्त जागेवर उमेदवारी दिली असुन आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मुंबई
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने दिली संजय दौंड यांना उमेदवारी
या महिन्यात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर 24 जानेवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय दौंड हे गेली बरीच वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. तर या जागेसाठी भाजपाकडून राजन तेली यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीने आपला उमेवार जाहीर केला असून, संजय दौंड यांच्या रूपात नवा चेहरा मैदानात उतरवला आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या या जागेवर आधी धनंजय मुंडे प्रतिनिधित्व करत होते. मात्र धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या जागेचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यातील असलेल्या संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *