मिरवट येथे महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

परळी वैजनाथ
Spread the love

मिरवट येथे महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व येथील कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप सोहळा मौजे मिरवट येथे आज संपन्न झाला.
दि . ८ जानेवारी २०२०ते १४ जानेवारी २०२० या काळात संपन्न झालेल्या या शिबिराचे मुख्य ध्येय सुदृढ युवती व स्वच्छ भारत हे होते . हे उदात्त ध्येय समोर ठेवून या शिबिरातील कार्याचे आयोजन करण्यात आले होते .
आज दु .१ . ०० वा . हा समारोप सोहळा प्रारंभ झाला . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कै . लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .आर. जे . परळीकर मॅडम या लाभल्या . प्रमुख अतिथी म्हणून कै .ल. द शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्या मा .सौ. छायाताई देशमुख या होत्या . या कार्यक्रमासाठी श्री रामेश्वरजी इंगळे ( उपसरपंच मिरवट ) , श्री हनुमानजी इंगळे , श्री प्रमोदजी तिडके ( कृषि सहायक ) , मा .मुंजाजी इंगळे , (आदर्श शिक्षक ), मा .संतोषजी तेलंग्रे ( ग्राम प्रवर्तक ) , मा .मधुकर इंगळे , मा .स्वाती पवार ( ग्रामसेविका मिरवट ) , मा . लिंबाजी बोंबले ( माजी सरपंच ) , मा .अविनाश पैठणकर आदि मान्यवरांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्या देवता सरस्वती , संत गाडगेबाबा व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .या प्रसंगी शिबिराचे कार्यक्रम अधिकारी डॉ .पी.व्ही गुट्टे यांनी आपल्या प्रास्ताविकात या शिबिराच्या प्रत्येक सत्रातील कार्याची / बौद्धिक सत्राची सविस्तार माहिती दिली . या शिबिराच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेतला . तसेच सहकार्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक करुन आभारही मानले . प्रसंगी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु . प्रतिभा कराड हिने आपले मनोगत व शिबिराचे अनुभव सांगितले , यानंतर मा . संतोषजी तेलंग्रे ( ग्राम प्रवर्तक मिरवट ) यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या शिबिराच्या माध्यमातून सर्व गावाला एकत्र आणण्याचे मोठे कार्य घडून आले व आपल्या प्रेरणेनेच आम्हींही एक मोठे रक्तदान शिबिर घेणार आहोत . असे प्रतिपादन त्यांनी केले . श्री हनुमान जी इंगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .
सरतेशेवटी अध्यक्षीय समारोप करतांना , ” सर्व गांवकऱ्यांनी छत्रपती शंभुराजें यांच्याप्रमाणे माता , स्त्री , कन्या यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी असे सांगून ” चंद्र मंगळावरती जाऊन आले भारतीय यान I
पण खंत वाटते की राबवावे लागते स्वच्छता अभियान .” असे सांगून स्वच्छतेची सुरवात स्वतःपासून करावी म्हणजे निरोगी रहाल , तुमचे मनही प्रसन्न राहील असे उद्गार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .आर. जे.परळीकर यांनी काढले .

या कार्यक्रम प्रसंगी मा .भाउसाहेब इंगळे , मा . शिंदे अशोक , मा .अंगद भदाडे , मा . नवनाथ साखरे मा .राजाभाऊ इंगळे , कु . मिताली बढे , गणेश सुरवसे , मा . दिलिप सुरवसे ,मा .अक्षय पत्की , प्रा .डॉ . संदीप जावळे आदि रक्तदात्यांचा व रा . से . यो. मधील प्रा .डॉ . जोशी , प्रा .डॉ .पाध्ये मॅ . प्रा . प्रवीण फुटके यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आला . तसेच शंभूराजे मित्रमंडळ मिरवट यांच्यातर्फ कै .ल. दे . महिला महाविद्यालयास शंभूराजेंची प्रतिमा देण्यात आली .
या प्रसंगी महाविद्यालयातील रा . से . यो. चे सह कार्यक्रमाधिकारी प्रा .डॉ . जोशी , प्रा . डॉ .पाध्ये , प्रा . शहाणे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन अधीक्षक मा . श्री पत्की सर यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती . विद्यार्थिनी वृन्दही प्रचंड प्रमाणात उपस्थित होता . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ . यल्लावाड यांनी केले तर आभार प्रा . प्रवीण फुटके यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *