शिल्पकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ना.धनंजय मुंडे साहेबांचा सन्मानपत्र देऊन गौरव

परळी वैजनाथ
Spread the love

शिल्पकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ना.धनंजय मुंडे साहेबांचा सन्मानपत्र देऊन गौरव

दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी परळी येथील सुर्यप्रकाश बुध्दविहार वाल्मिकी नगर, रेल्वे स्टेशन रोड, परळी-वैजनाथ या विहारात थायलँड येथून आलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब, सामाजिक न्यायमंत्री, विशेष सहाय्य तथा पालक मंत्री यांचा गौरव आयु.मुकूंद ताटे, अध्यक्ष शिल्पकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परळी-वै. यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात
आला.

यावेळी मा. ना. धनंजय मुंडे साहेबांनी तुसाम परिवाराचे धम्म कार्याबद्दल गौरव करुन पुष्पहार देऊन गौरव केला. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, सुरेशजी टाक अण्णा , किशोर पारधे, रवि मुळे,
गोविंद मुंडे, अनंत इंगळे, बालाजी चाटे, महेंद्र रोडे, दत्ताभाऊ सावंत, महादेव ताटे, त्रिंबक कांबळे, मारोती घाडगे, सुनिल वाघमारे, शिवाजी बन्सोडे,
अशोक वाघमारे, उत्तम गोडबोले, किशन कारंजे, ऋषि मुंडे, आदित्य तुसाम,दशरथ रोडे, विलास रोडे, कु. जागृती तुसाम, आयु. कांतादेवी तुसाम, दिपाली
जाधव, शारदाताई कांबळे, मंगलताई माने, बेबीखाला तांबोळी, फुलचंद गायकवाड, प्रताप खंडागळे, सिद्वार्थ जगतकर, आदि उपस्थित होते,सुत्रसंचलन प्रा. विनोद जगतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.
ब्रम्हानंदजी कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *