विद्यापीठ नामविस्तारानंतर तांत्रिक शिक्षणाची गरज-डॉ ज्ञानोबा मुंडे यांचे प्रतिपादन

परळी वैजनाथ
Spread the love

विद्यापीठ नामविस्तारानंतर तांत्रिक शिक्षणाची गरज— डॉ ज्ञानोबा मुंडे यांचे प्रतिपादन

. परळी वार्ताहर.. जवाहर शिक्षण संस्थेचे वैद्यनाथ कॉलेजमध्ये 26 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी विद्यपीठाने नामविस्तारानंतर तांत्रिक शिक्षणाची गरज याकडे विद्यापीठाने लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. के. इप्पर, प्रमुख वक्ते डॉ.ज्ञानोबा मुंडे, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डी. के आंधळे, उपप्राचार्य डॉ. व्ही. जे. चव्हाण, डॉ. जे. व्ही. जगतकर, प्रा. एस. एम सूर्यवंशी, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. एस. आर. सूर्यवंशी यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब शेप यांनी विद्यापीठ नामविस्तार याची पार्श्वभूमी सांगून लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे विरोधी पक्षनेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यपीठाला देण्यासाठीच्या विधिमंडळातील नामांतराच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले होते असे सांगितले. तर प्रमुख डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी नामांतर असणारा हा प्रदीर्घ लढा होता. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या चळवळीतील नामांतर लढ्याला फार मोठे मोलाचे स्थान आहे असे सांगून 1978 ते 1994 या 22 वर्षांच्या काळात जाळपोळ, गोळीबार अशा विविध घटना घडल्या. नामांतर विरोधी गटाने याला पाठिंबा दिला होता. नामांतर व्हावे यासाठी मराठवाड्यातील विविध संघटनांनी नामांतर चळवळीला पाठिंबा दिल्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला 14 जानेवारी 1994 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यात आले. नामांतरानंतर विद्यापीठातील शिक्षणात तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता आहे असे सांगून आजच्या युगात उच्च शिक्षण उंचावण्यासाठी विद्यापीठांने प्रयत्न करावे असेही मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य आर. के. इप्पर यांनी नामांतर चळवळीचा मराठवाड्यातील अनेक तरुणांनी बलिदान दिले असून मराठवाड्यातील मागासलेले उपेक्षित, वंचित घटकांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले त्यामुळेच मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते मराठवाड्यातील शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते ठरले असेच म्हणावे लागेल. विविध विद्यापीठात आधुनिक शिक्षणाचा विचार करून अभ्यासक्रम तयार करावा असेही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम कांदे यांनी केले तर आभार डॉ. विष्णू चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *