संस्कार प्राथमिक शाळेची यावर्षीची लक्षणीय सहल संपन्न

परळी वैजनाथ
Spread the love

*संस्कार प्राथमिक शाळेची यावर्षीची लक्षणीय सहल संपन्न.*

परळी येथील सतत काहीतरी वेगळा उपक्रम करणारी म्हणून नावाजलेली संस्कार प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली.
विध्यार्थाना दैनंदिन कामातून दैंनदिन शालेय ताणातून थोड्या दिवसाची सुटका देऊन तसेच विध्यार्थाना पर्यावरणाची माहिती, बाहेरील जगाची ओळख होण्याच्या हेतूने पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजित करण्यात आली होती दिनांक 6/01/2020 वार सोमवारी श्री आव्हाड साहेब (सहाय्यक कक्ष अधीकारी शिक्षण विभाग मुंबई )व संस्थेचे अध्यक्ष दिगंबरराव धुमाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून सहल पुण्याकडे रवाना झाली या सहली दरम्यान सर्वप्रथम पुण्य जवळील अष्टविनायकापैकी एक असलेल्या रंजन गावचा महागणपतीचे दर्शन घेतले. या नंतर जवळच असलेल्या भीमा कोरेगावातील विजयस्तंभाचे विध्यार्थ्यानी दर्शन घेतले लागलीच काही अंतरावर असलेल्या धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन विध्यार्थ्यांना झाले अश्या ऐतिहासिक स्थळांना विध्यार्थ्यानी भेटी दिल्या त्याच बरोबर आळंदीतील संत ज्ञानेश्वर समाधीचे दर्शन घेऊन मुक्काम केला दुसऱ्या दिवशी विध्यार्थ्यानी सर्वांच्या स्वप्नातील मुंबई पाहण्यासाठी कुच केली या ठिकाणी ‘गेट वे ऑफ इंडिया’ पाहून परळीचे लाडके ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला या दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री कु. अदितीताई तटकरे मॅडमशी विध्यार्थ्यानी चर्चा केली.
या नंतर दुसऱ्या दिवशी सहलीचा मुख्या गाभा आणि विद्यार्थ्यांचे खास आकर्षण म्हणजे ‘इमॅजिक वॉटर पार्क खोपोली’कडे रवाना झालो.
या दिवशी विद्यार्थ्यांनी आपले तन मन धन हरवून या इमॅजिका पार्कमधील विविध राइड्सचा मनमुराद आनंद घेतला. यात सर्वांचे आकर्षण ठरले ते “व्हेव पूल” या ठिकाणी विद्यार्थी बेधुंद होऊन नाच गाण्यांचा आनंद घेत होते यादरम्यान दिवस कधी संपला ते कळलंच नाही.
परळी शहरातील एक आदर्श, नाविन्यपूर्ण, उपक्रमशील शाळा म्हणले तर वावगे ठरणार नाही ती म्हणजे संस्कार प्राथमिक शाळा. या सहली दरम्यान अशीच एक उपक्रमशील शाळा पाहण्याचा योग विद्यार्थ्यांना आला कि ज्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीत रस आहे त्यात ते विद्यार्थी करियर घडवितात अशी शाळा म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बावळेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळा याठिकाणी संस्कार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा बावळेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांशी तसेच तेथील शिक्षकांशी हितगुज केले आणि त्या ठिकाणच्या वर्गांची, मैदानाची, ग्रंथालयाची, प्रयोगशाळेची पाहणी करत करत विचारपूस केली. आणि अतिशय उत्साहाने व आनंदाने ऐतिहासिक व भौगोलिक ज्ञानाची शिदोरी घेऊन परतिचा प्रवास सुरु झाला. या सहलीत विविध मंदिरे. पुरातन व ऐतिहासिक स्थळांचे महत्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
सहल यशस्वी करण्यासाठी सहल प्रमुख इंगळे सर, लाडेकर सर, गंडले सर, केंद्रे सर, गायकवाड सर , पालेवाड सर, पापुलवाड सर, सोळंके मॅडम, गित्ते मॅडम, फड मॅडम, रावळ मॅडम, क्षीरसागर सर, दहिफळे सर, गणेश तांदळे आदी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *