जगभरात कोरोनामुळे २ लाख ३९ हजारांहून अधिक रूग्णांचा मृत्यू

मुंबई
Spread the love

न्यूयॉर्क : जगात कोरोनाने चांगलाच थैमान घातला आहे. त्यातच २१२ देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ३९ हजार पार पोहोचली आहे. मागील २४ तासांत ९४ हजार ५५२ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ५६२४ वाढला आहे. वर्ल्डोमीटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत ३३ लाख ९८ हजार ४७३ लोकांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. यांपैकी १,०८०,१०१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या एकूण आकड्यापैकी जवळपास एक तृतियांश रूग्ण अमेरिकेमध्ये आढळून आले आहेत. तर जवळपास एक चतुर्थांश मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेनंतर स्पेन कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेला दुसरा देश आहे. जिथे २४,८२४ लोकांचा मृत्यू झाला असून एकूण २४२९८८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये आतापर्यंत २८२३६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्या लोकांची संख्या २०७,४२८ वर पोहोचली आहे. यानंतर फ्रान्स, जर्मनी, युके, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देशा जास्त प्रभावित झाले आहेत.