नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

परळी वैजनाथ
Spread the love

नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेचे परळीच्या नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते आज रविवारी परळी उपजिल्हा रुग्णालयात
शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एल. एल. मोरे, डाॅ. अनुराधा माले यांच्या हस्ते बालकांना पोलीओची लस देण्यात आली. याप्रसंगी रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सदरील राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेत परळी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 23118 एवढे अपेक्षित लाभार्थी आहेत. सदरिल बालकांना 221 बुथद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. तरी 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना जवळच्या पोलीओ बुथवर जाऊन पोलीओची लस देण्यात यावी असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे सर व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एल.एल. मोरे यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *