बीड जिल्हयाची जिल्हाधिकारी यांनी केली नियमावली जाहिर;होम डिलेव्हरी,पास धारक अदीना सवलती

बीड
Spread the love

बीड जिल्हयाची जिल्हाधिकारी यांनी केली नियमावली जाहिर
होम डिलेव्हरी,पास धारक अदीना सवलती

बीड….
. शिवणकाम कुमार.लोहार,चांबार,धोबी प्रेस करणे,पेटर,सुतार, इलेक्ट्रीशियन, प्लंबर से भंगार रद्दी व्यवसायिक तसेस आॕडिटर,ब्रोकर, सी.ए. यांनी व्यवसाय सुरु करण्यापूर्वी ज्या क्षेत्रात काम करणार आहेत त्या ठिकाणाच्या संबधित स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत) यांची शिफारस पत्र बनवुन घ्यावीत,आणी पास घेऊन काम सुरु करावे. एल.आय.सी. एजंट यांनी त्यांच्या जिल्हास्तरीय मुख्य अधिकाऱ्यां कडुन शिफारसपत्र घ्यावे. आणि पास बनवुन काम सुरु करावे. वरीलपैकी या कामाचे स्वरुप फिरते आहे दिवसभर दररोज पूर्णवेळ काम करण्यास हरकत नाही. वरील पैकी ज्यांचे काम त्याच दुकानात होते अश्यानी कार्यालयात होता त्यांना आपले दुकान/कार्यालय विषम तारखेस सकाळी 7ते सकाळी 9-30 पर्यत उघडता येतील.
वरील साहित्य विषयी दुकाने सुध्दा विषम दिनाकास म्हणजेचसकाळी 7ते सकाळी 9-30 पर्यत उघडता येतील.
सर्व ई काॕमर्स कंपन्याना कोणत्याही वस्तुंच्या सेवा नियमाप्रमाणे देता येतील, बीड जिल्हयातील सर्व प्रकारचे खाजगी व शासकीय बांधकामे विषम दिनाकास सकाळी6 ते 10-30सकाळी ही वेळ वगळता सुरु करता येतील. यासाठी सर्व कर्मचारी/कामगार यांच्या कडे मागील आदेशाप्रमाणे (दिनांक 23-4-2020) नियंञक अधिका-याकडून शिफारस पत्र घेवून पास मिळविल्या नंतरतच कर्मचाऱ्यांना कामावर येता येईल. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक कर्मचारी/कामगार यांनाच काम करण्यासाठी वापरण्यात येईल याची जबाबदारी संबंधित विभाग,मालमत्ता धारक व कंत्राटदार यांची संयुक्त राहील.
फ्रेबीकेशन, इलेक्ट्रीकल साहित्य, होम अपलायन्सेस, फर्निचरची दुकाने, बेकरी,कंफेशनरी ड्रायफुटरची दुकाने.स्विट मार्ट,मिठाई भंडार तसेच पूर्ण जिल्हयातील सर्व वाहन दुरुस्तीची दुकाने आणि त्यासाठी लागणारे स्पेअर पार्टसची दुकाने विषम दिनांकास सकाळी 7 ते सकाळी 9-30 या काळात उघडी राहतील. सदरील दुकानदार यांनी त्यांचे कार्मचारी स्वत:चा व दुकानाचा पास काढूनच दुकाने उघडावीत.

. सर्व प्रकारचे कपडे, भाडयाची दुकाने, चप्पल व बुट इ.दुकाने दिनांक 5.11.17 मे 2020रोजी सकाळी 7 सकाळी 9-30 या वेळेत उघडे राहू शकतील.

विद्याध्यांची शैक्षणिक पुस्तकाची दुकाने वगळता इतर सर्व पुस्तकांची व स्टेशनरीची दुकाने, कॉसमेटीक्स, जनरल स्टोअरची दुकाने दिनांक 7 व 13 में 2020 रोजी सकाळी 7ते सकाळी9-30 या वेळेत उघडी राहु शकतील.

केशकर्तनालय चालक आणि ब्यूटी पार्लर चालक यांना आपले दुकान न उघडता केवळ ग्राहकांच्या घरी जाऊन सेवा देण्यास दररोज पूर्ण वेळ परवानगी देण्यात येत आहे. यासाठी त्यांना नगर परिषद,नगर पंचायत,ग्रामपंचायत यांचे शिफारस पत्र घेवून पास मिळवून मगच काम सुरु करता येईल.
काम करतांना त्यांना सोबत कोणताही नैपकीन,टॉवेल इ.घेवून जाता येणार नाही. याबाबी त्यांनी ग्राहकांकडून उपलब्ध करून घ्याव्यात
स्वताचे सर्व साहित्य डेटॉल/ साबणाच्या पाण्याने निरजुंतुकीकरुनच प्रत्येक ग्राहकासाठी वापरावे आणि मास्क/ जाड कपडा वापरुन स्वत:चे नाक व तोंड पूर्णपणे झाकलेले राहील याची खात्री करावी.

त्यांना ताप.खोकला.सी.ठोके दुखी किंवा श्वासनाचा यापैकी कोणताही ञास होत असेल तर त्यांनी स्वताच्याच घरी थांबावे.
त्यानी कोवीड संबंधित स्वच्छतेची काळजी घ्यावी.
केवळ फळ विक्रेत्यांना शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन फळे खरेदी करून शहरांमध्ये फिरून तसेच कोणत्याही स्वरूपाचा होलसेल किंवा हळद बाजार न करता फळ विक्री करण्यास दररोज पूर्णवेळ परवानगी देण्यात येत आहे त्यांनी या विषयाच्या तालुकास्तरीय समितीकडे अर्ज करून अशाप्रकारचा फळ विक्री परवाना मिळवून नेमून दिलेल्या क्षेत्रातच फळ विक्री करणे बंधनकारक राहील तसेच शेतावर जाऊन खरेदी करून फळे व भाजीपाला तालुका किंवा जिल्हा बाहेर निर्यात करण्यासाठी बाजार न भरवता परवानगी देण्यात येत आहे

दिनांक 10 मे 2020 पर्यंत जिल्ह्यातील सर्व अकरा शहरातील सर्व दुकानदार व नागरिकांनी निडली हे होम डिलिव्हरी ॲप जोकी विनाशुल्क सेवा देत आहे. ते अॕप प्ले स्टोर मधून डाऊनलोड करून घ्यावे. आणि या अॕप मधूनच लागणाऱ्या साहित्याची खरेदी होम डिलिव्हरी स्वरूपात जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करावा. दिनांक 10 मे पासून सर्व 11 शहरांमधील कोणतेही किराणा दुकान विषम दिनांक सकाळी सात ते सकाळी साडेनऊ या काळामध्ये सुद्धा उघडता येणार नाहीत आणि दुकानाची होम डिलिव्हरी साठी दिवसभर दररोज काम करणारी यंत्रणा तोपर्यंत कर्मचारी यांचे पाससह उभारावी अशाच पद्धतीने ठराविक कालांतराने एका प्रकारची ग्राहक उपयोगी वस्तूंची सेवा होम डिलिव्हरी प्रकारात पूर्णपणे समाविष्ट करून जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल जेणेकरून इतर उद्योगांना चालना मिळेल अश्या पध्दतीने बीड जिल्ह्यातील व्यापार उद्योग अदीना सवलती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *