विविध मागण्यासंदर्भात महापारेषण कर्मचार्यांचे एकदिवशीय धरणे आंदोलन

परळी वैजनाथ
Spread the love

विविध मागण्यासंदर्भात महापारेषण कर्मचार्यांचे एकदिवशीय धरणे आंदोलन
परळी (प्रतिनिधी)
घरभाडे,पेट्रोलभत्ता वाढ देण्यात यावी कंत्राटी कामगारांचा पगार राष्ट्रीयकृत बॅंकेच्या खात्यावर करण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी वर्कर्स युनियन च्या माध्यमातुन महापारेषणच्या कर्मचार्यांनी आज दि.20 जानेवारी रोजी अधिक्षक अभियंता,अति उच्चदाब संवसु मंडळ परळी कार्यालयापुढे एकदिवसीय धरणे आंदोलन केले.आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कुठलाही अधिकारी आला नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचार्यांनी दिला.
महापारेषण कर्मचार्यांना 15 % घरभत्ता देण्यात यावा,7 लिटर पेट्रोल या प्रमाणे वाहनभत्ता द्यावा, मुख्य कार्यालयाचे पत्र क्र.9478 प्रमाणे पदोन्नतीची कार्यवाही करावी,बीड विभागात ग्रास कटिंगचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात यावे,उजनी 132 के.व्ही.उपकेंद्रातील कंट्रोल रुम मध्ये वायरिंगचे काम करावे या व इतर मागण्यासंदर्भात,म.रा.स्वाभिमानी वर्कर्स युनियन च्या वतिने दि.6 जानेवारी रोजी निवेदन देवुन दि.20 जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता.परळी संवसु कार्यालयाकडुन मागण्यांची पुर्तता न झाल्याने परळी झोन अंतर्गत येत असलेल्या बीड,लातुर व नांदेड या तीन्ही जिल्यातील कर्मचार्यांनी आज दिवसभर धरणे आंदोलन केले.या आंदोलनात संघटनेचे कार्याध्यक्ष डि.बी.बोर्डे,सचिव डि.डब्ल्य.गुट्टे,एस.बी.बडे,एस.एम गित्ते,सौ.एस.एल बर्दापुरकर,डि.बी.मस्के,पी.के.आडसकर,आर.आर.फुलसुरे,लातुर विभागातून प्रशांत महाजन,चंद्रकांत गुरव,चंद्रशेखर शिरणाळे,विनायक नवटाके,कैलास बेंबडे,संगीता जाधव,परशुराम दराडे,बीड विभागातील विठ्ठल नेटके,मंजित झवेरी,आर.वाय कोळी,गिरवली विभागातून गोविंद चाटे,गोविंद गित्ते,रामेश्वर बोकन आदी कर्मचारी सहभागी झाले होते. सदरील मागण्यांच्या पुर्ततेसंदर्भात विभागीय कार्यालय व अति उच्चदाब संवसु मंडळ परळी कार्यालये एकमेकांवर चालढकल करुन दुर्लक्ष केले जात असल्याने यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्ते कर्मचार्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *