ग्राहक संरक्षण संघटनेच्या मराठवाडा संघटक सचिवपदी आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती

परळी वैजनाथ
Spread the love

ग्राहक संरक्षण संघटनेच्या मराठवाडा संघटक सचिवपदी आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी येथील परळी समाचारचे संपादक तसेच विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी आत्मलिंग शेटे यांची राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटना (नॅशनलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनाएझेशन) च्या मराठवाडा संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मा.संजय पाठक यांनी पाठवले असून ही नियुक्ती 2 वर्षासाठी असल्याचे यात नमुद केलेले आहे. ग्राहकांचे हक्क मिळवून देणारी व ग्राहकांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध लढणारी ही संघटना असून या मार्फत ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवणे, ग्राहकांना मिळणार्‍या वजन मापातील तफावत, एमआरपी प्रमाणे मालाचे पैसे न घेता जास्तीचे पैसे घेणे, खाद्य पदार्थ, पेयजल, खाद्य मसाले इत्यादीतील भेसळ याबाबत आवाज उठवणारी ही संघटना असल्याचे पत्रात नमुद केलेले आहे व याबाबत जेष्ठ पत्रकार व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असलेले आत्मलिंग शेटे चांगले कार्य करतील व सर्वसामान्य ग्राहकांना न्याय मिळवून देतील असा विश्वास संजयजी पाठक यांनी पत्रात व्यक्त केला.
तसेच या संघटनेचे महाराष्ट्र निरीक्षक संजीव जोशी, महाराष्ट्र संघटन सचिव डॉ.सुनीलकुमार थिगळे, महाराष्ट्र सचिव सौ.नलीनी गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी आदी पदाधिकार्‍यांनी आत्मलिंग शेटे यांचे अभिनंदन केले आहे.
आत्मलिंग शेटे यांनी ही निवड झाल्याबद्दल सांगितले की, आपण ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित काम करून ग्राहक संरक्षण, शोषणमुक्तीची चळवळ अभियानाचा प्रसार करून ग्राहकांचे प्रश्न सोडवणे व जागो ग्राहक जागो अभियान अंतर्गत “तक्रार तुमची कार्यवाही आमची” हा संघटनेचा मुलमंत्र जोपासण्याचे काम करून संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांचे प्रश्न सोडवनार असल्याचे आत्मलिंग शेटे य़ांनी सांगीतले त्यांच्या निवडी बध्दल सर्वत्र अभिंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *