प्रशासनाला हूलकावनी देत भाजीपाल्याच्या आड दारु विक्री चेकपोष्टवर दारु विक्रेत्यास पकडले रंगेहाथ

बीड
Spread the love

प्रशासनाला हूलकावनी देत भाजीपाल्याच्या आड दारु विक्री
चेकपोष्टवर दारु विक्रेत्यास पकडले रंगेहाथ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिशय सतर्कता बाळगली जात आहे. ठिकठिकाणी तपासणी करून व बाहेर फिरण्याची कारणे जाणून घेतल्यानंतरच चेकपोस्ट वरुन सोडले जाते. परंतु चेकपोस्ट चुकविण्यासाठी काही जण नामी शक्कल लढवून प्रशासनाला हुलकावणी देत आहेत. असाच एक प्रकार परळीतील एका चेकपोस्टवर शनिवारी सकाळी 5.30 च्या सुमारास उघडकीस आला आहे.
प्रशासनाला हुलकावणी देणाऱ्या एकाला पकडले असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या आरोपीला चेकपोस्टवर अडवले तेव्हा सांगितले गेले की, पोत्यात भाजीपाला आहे. पण संशयाने तपासणी केली तर हातभट्टीची दारु निघाली. परळी शहर व तालुक्यातील मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी विषम तारीख

असल्याने शिथिलता असल्याने बाजारासाठी नागरिक बाहेर पडले. शहरालगत असलेल्या मेरुगिरी रस्त्यावरून येताना चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांना परळीकडे दुचाकीवरून निघालेल्या एकाला थांबवले व काम काय आहे? बाहेर पाण्याच्या कारणाची विचारणा केली. तेव्हा भाजीपाला घेऊन विक्रीसाठी जात असल्याचे या व्यक्तीने सांगितले.

परंतु मोटारसायकलवर बांधलेल्या पोत्यात भाजीपाला नसल्याचा संशय चेकपोस्टवरील कर्मचाऱ्याला आला. त्यामुळे तपासणी केली असता त्यात हातभट्टीची दारु आढळून आली. त्यानंतर या व्यक्तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे. वशिष्ट भानुदास कांदे (वय 39 रा.जिरेवाडी) असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर त्वरित कारवाई केली असून गावठी हातट्टीची 2500 रुपयांची तयार दारु हस्तगत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *