प्रजासत्ताक दिनानिमित्त वैद्यनाथ कारखाना येथे खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

परळी वैजनाथ
Spread the love

प्रजासत्ताक दिनानिमित्त वैद्यनाथ कारखाना येथे खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

परळी वैजनाथ दि. २६…
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पांगरी येथे बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वैद्यनाथ कारखाना परिसरात खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संविधान उद्देशाचे वाचन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कारखान्याचे सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *