राष्ट्रीय कुटूंब कल्याण संस्था नागपुरच्या टीमची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट

परळी वैजनाथ
Spread the love

राष्ट्रीय कुटूंब कल्याण संस्था नागपुरच्या टीमची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट

राष्ट्रीय कुटूंब कल्याण संस्था नागपुरच्या टीमची परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य वर्धिणी प्रशिक्षण केेंद्राला आज बुधवारी भेट दिली.
नागपुर राष्ट्रीय कुटूंब कल्याण संस्थेचे संचालक डाॅ. उमेश नवाडे, सहाय्यक प्राध्यापकडाॅ. संजय चिलकर,व प्रशासकीय अधिकारी, शिरपुरकर
यांनी परळी उपजिल्हा रुग्णालयालाच्या आरोग्य वर्धिणी प्रशिक्षण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली व समुदाय आरोग्य अधिकारी यांना परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. या टीमने आरोग्य वर्धिणी प्रशिक्षण केंद्राचे व रुग्णालयाचे कामकाज चांगल्या प्रकारचे असुन शस्त्रक्रिया व प्रसुती विभागास मिळालेल्या लक्ष प्रमाणपत्राबद्दल समाधान व्यक्त करुन हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी आरोग्य वर्धिणी प्रशिक्षण केंद्राचे नोडल अधिकारी डाॅ. दत्तात्रय केंद्रे, डाॅ. दिनेश कुर्मे, डाॅ. प्रदीप सानप, डाॅ. नाथराव फड, श्री. आविनाश राऊत, श्री. रामधन कराड, श्री. हरिभाऊ सर्जे, श्री. प्रशांत कराड, श्री. शेख सादेक व समुदाय आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *