माजी मंत्री पंडितराव दौंड रमले गावकर्‍यात जुन्या आठवणींना दिला उजाळा

परळी वैजनाथ
Spread the love

माजी मंत्री पंडितराव दौंड रमले गावकर्‍यात
जुन्या आठवणींना दिला उजाळा
.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड यांनी मलकापूर येथे सदिच्छ भेट दिली. व गावकर्‍यात रमले तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र संजय दौंड विधानपदिषदेचे सदस्य झाल्यानंतर त्यांची मलकापुर नगरीतील ही पहिली भेट होती. यावेळी गावकर्‍यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी यांनी 61 वर्षापुर्वीच्या जुनी आठवणी काढुन त्यांना उजाळा दिला. गावकर्‍यांशी सुसंवाद साधला. तसेच मलकापुर मधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बोरणा प्रक्लपातुन पाईपलाईनद्वारे पाणी आणूत असे आश्वासन दिले. तसेच गावातील इतर नागरी सुविधा सोडविण्यासाठी प्राधान्य देऊत असे सांगितले.
यावेळी माणिकराव गित्ते, अण्णासाहेब गित्ते, जिवन गित्ते, फुलचंद गित्ते, पिंटु गित्ते, सचिन गित्ते, पत्रकार महादेव गित्ते, बाबासाहेब गित्ते, मलकापुर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *