_घाटनांदूर येथील बाळासाहेब काका देशमुख यांचा रौप्यमहोत्सवी सत्कार

परळी वैजनाथ
Spread the love

*_घाटनांदूर येथील बाळासाहेब काका देशमुख यांचा रौप्यमहोत्सवी सत्कार_*

*बाळासाहेब काकांच्या समाज कार्याचा निरंतर ध्यास प्रेरणादायी- धनंजय मुंडे*

घाटनांदूर दि.01……. घाटनांदूर येथील बाळासाहेब (काका) यशवंतराव देशमुख यांनी घाटनांदूर सारख्या परिसरात शैक्षणिक संस्थांची स्थापना करून अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांनी समाज कार्याचा घेतलेला निरंतर ध्यास नवीन पिढीतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 

काकांच्या रौप्यमहोत्सवानिमित्त घाटनांदूर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, पंडितराव दौंड, आ. सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्या ताई सिरसाट, मजुर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत काकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

यावेळी बाळासाहेब काकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा शब्दाई हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. त्याचबरोबर काकांची ग्रंथतुला करण्यात आली. वयाची 75 वर्षे समाजकार्य केलेल्या बाळासाहेब काकांना 100 वर्षे आयुष्य लाभो, पुन्हा त्यांच्या शतकपूर्तीच्या सोहळ्याला आपण सगळे एकत्र येऊ असे ना. मुंडे म्हणाले. उपस्थित नागरिकांनाही ना. मुंडे यांनी दर्जेदार रस्ते तर करूच पण सामान्य माणसाचे उत्पन्न वाढावे यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्द दिला; यावेळी माजी आ.पृथ्वीराज साठे, समाज कल्याण सभापती कल्याण आबुज, राजेसाहेब देशमुख, विलास सोनवणे, दत्ता आबा पाटील, गौरव समितीचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, कृ.उ.बा.समितीचे सभापती अ‍ॅड.गोविंदराव फड, परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गणेश देशमुख, बबन भैय्या लोमटे, तात्यासाहेब देशमुख, माऊली जाधव, समीर पटेल, विलास मोरे, गोविंदराव देशमुख यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
 
परळी मतदारसंघातील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य व नामांकित कामधेनू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात वाहती करणारे माझे मार्गदर्शक व माझेच नव्हे तर परळी व अंबेजोगाई तालुक्यातील अनेक शिक्षण कर्मींचे प्रेरणास्थान आदरणीय बालासाहेब काका देशमुख यांची वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत आहे. तसेच या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ’शब्दाई’ हा विशेषांक प्रकाशित होत आहे. काकांच्या प्रेरणादायी प्रवासाला, शब्दाईला व शब्दाईच्या प्रकाशन सोहळ्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
आदरणीय काकांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास व सोहळा आयोजित करणार्‍या स्वागत समितीसही मनस्वी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *