परळीतील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसंग्राममध्ये प्रवेश बजरंग सोनवणेंना मताधिक्य देणार-तुळशीराम पवार

आंतरराष्ट्रीय

परळी विधानसभा मतदार संघातील सिरसाळा येथील भाजपा कार्यकर्ते सय्यद राजु यांनी आ. विनायकराव मेटे यांच्या अवाहानाला प्रतिसाद देवुन परळी शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष तुळशीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली सय्यद राजु यांनी शिवसंग्रामध्ये प्रवेश केला. सय्यद राजु यांच्या समवेत तन्वीर फारुकी, मेहराज मुलानी, पठाण मन्सर, शेख मुस्तफा, इस्माईल खुरेशी, वैजीनाथ शिंदे, शेख अस्लम, सय्यद वसीम, सय्यद नुर आदी मुस्लिम युवकांनी शिवसंग्राममध्ये प्रवेश केला आहे. सय्यद राजु यांच्यावर सिरसाळा शिवसंग्राम शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असुन सिरसाळा येथील युवक राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचाराला लागले आहेत.
बीड लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार व ना. पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय काळात जिल्हयातील सामान्य जनतेला न्याय मिळाला नाही. विकासाच्या नावावर गप्पा मारून जनतेला थापा मारण्याचे काम चालु आहे. स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाचा हवाला देत. जनतेला भावनीक करून मत मागण्याचा सपाटा चालु आहे. कॅबीनेट मंत्री असुनही जिल्हयात विकासाची कामे प्रभावीपणे राबवु शकलेले नाहीत. जिल्हा प्रशासनात राजकीय अश्रयामुळे भ्रष्टाचार बोकळला असुन भाजपा सेना महायुतीचे सरकार असुन सुध्दा जिल्हा प्रशासनात कोणताही बदल जनहीताचा झालेला दिसुन येत नाही. शेतकरी, ऊसतोड कामगार, महिला यांच्या प्रगतीसाठी कोणत्याही योजना राबवण्यात बीड जिल्हा मागे राहिला आहे. बीड जिल्हयातील शेतकर्‍यांना सर्वाधिक विम्याची रक्कम मिळाली हे खरे असले तरी शेतकर्‍यांच्या पदरात मात्र ही रक्कम पोहचलेली नाही. शेतकर्‍यांची बँक डिसीसी बँक या बँकेत शेतर्‍यांचा पैसा आला परंतू या बँकेने हा पैसा दुसर्‍या बँकेत ठेवला. हि बाब गंभीर असुन शेतकर्‍यावर अन्याय करणारी आहे. या कडे ही ना. पंकजामुंडे यांनी सोईस्करपणे दुर्लक्ष करून शेतकर्‍यावर अन्याय केलेला आहे. हा असंतोष परळी मतदार संघातील ग्रामीण मतदारामध्ये धुमसत आहे. येणारा उद्याच्या लोकसभा निवडणूकीत हा असंतोष प्रकट होणार आहे. आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताकतीने कामाला लागले असुन परळी मतदार संघातुन शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे यांना मताधिक्य देण्याचा संकल्प मतदार बांधव व शिवसंग्रामने केला आहे. असे पत्रक शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष तुळशीराम पवार यांनी प्रसिध्द केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *