प्रस्थापीतांना हबाडा देऊन प्रा.विष्णू जाधव यांना विजयी करा डॉ गणेश खेमाडे.

आंतरराष्ट्रीय

वंचित बहुजन आघाडीस अल्पावधीतच राज्यात मोठा जनाधार मिळत आहे.बीड जिल्हयामध्ये व.ब.आ.चे ऊमेदवार प्रा विष्णु जाधव यांना पुरोगामीवादी,संवीधानवादी चळवळीत कार्यरत सामाजीक कार्यकर्ते, पक्ष, संघटना यांनी विनाशर्त पाठिंबा दर्शवलेला आहे. प्रा.विष्णु जाधव यांच्या प्रचाराची धुरा आता सर्व सामान्य कार्यकर्ते यांनी आपल्या खांद्यवर घेतल्याने जाधव यांचा विजय निश्चित आसल्याचे मत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश खेमाडे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ने आठरापगड जाती,आलुतेदार बलुतेदार तसेच वर्षानुवर्ष राज सत्ते पासुन कोसो दुर असणाऱ्या गाव गाड्यातील अल्प संख्यांक जातीं मधिल ऊच्च शिक्षीतांना लोक सभेचे प्रतीनिधीत्व देऊन सत्तेच्या प्रवाहात येण्याची सुवर्ण संधी ऊपलब्ध करूण दिलेली आहे.म्हणुनच गावोगावच्या तरूणाईने वंचित बहुजन आघाडीच्या या समता वादी भुमीकेच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्यामधुन मोठे कार्य ऊभे केले आहे.येत्या 18 तारखेला कपबशी या चिन्हासमोरील बटन दाबुन प्रा विष्णु जाधव यांना प्रचंड मतांनी निवडुन आनण्याचा निर्धार या वेळी केला.
बीड तालुक्या मधील घोडका राजुरी, मौज,जरूड, मोची पिंपळगाव येथील घरोघरी प्रचारार्थ किरण वाघमारे,प्रशांत वासणीक, सुहास विद्यागर, गौतम वाघमारे, गणेश वीर, गेले असता ग्रामस्थांचा मोठा प्रतीसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *