दसऱ्ु या टप्प्यातील प्रचार आज संपणार;दोन्हीही पक्षाकडुन शक्ती प्रदर्शन

महाराष्ट्र

पहिल्या टप्प्यातील मतदान
झाल्यानंतर आज दसऱ्या टप्प्यातील लोकसभेच ु ा
प्रचारही संपणार आहे. येत्या १८ एप्रिल रोजी
राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघात मतदान
घेतले जाणार अाहे. या पार्श्वभूमीवर आज दि.१६
एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून
प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
अकोला, बुलडाणा, अमरावती, हिंगोली,
नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर व
सोलापूर आदी ठिकाणी येत्या १८ एप्रिल रोजी
मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून
प्रचाराच्या रणधुमाळीने मराठवाडा, विदर्भ आणि
पश्चिम महाराष्ट्रातील या मतदारसंघात चांगलेच
वातावरण तापले होते. युती आणि आघाडीच्या
अनेक नेत्यांच्या तोडीस तोड वंचित बहुजन
आघाडी आणि काही ठिकाणी अपक्षांच्याही
मोठ्या सभा झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील एकू ण ४८ जागांपैकी १८
एप्रिल रोजी १० लोकसभा मतदारसंघात दसऱ्या ु
टप्प्यात निवडणूक होत आहे. राज्यातील ७
मतदारसंघात पहिल्या टप्प्यासाठी मतदान
घेण्यात आले होते. गडचिरोलीत घडलेल्या
अपवादात्मक घटना वगळता पहिल्या
टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले होते.
वाढत्या उष्णतेमुळे मतदानाच्या आकडेवारीवर
मोठा परिणाम होत असून, २०१४ च्या तुलनेत
यावर्षी मतदानाची आकडेवारी घसरल्याचे दिसून
येत आहे. प्रशासन निवडणूकांची जय्यत तयारी
करीत असून, मतदानाची आकडेवारी वाढावी
यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मोठ्या
प्रमाणावर जनजागृतीही करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *