वैद्यकीय अधिक्षक तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉ रामेश्वर लटपटे यांचे दुःखद निधन
परळी वै…
परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉ रामेश्वर रामकिशन लटपटे यांचे पुणे येथील सह्याद्री हाॕस्पिटल येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.
वैद्यकिय अधिक्षक तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉ रामेश्वर लटपटे हे गेल्या महिण्यात हैद्राबाद येथे उपचार घेऊन परळीत उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षक म्हणुन कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना प्रकृती ठीक नसतांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदभार घेतला.कोरोनाच्या या लढाईत त्यांनी फार मोठे योगदान दिले परंतु प्रकृती साथ देत नसल्याने उपचारासाठी हैद्राबाद नंतर पुणे येथे उपचार चालु असतांना त्यांची प्राणजोत मावळली आणी ही बातमी वा-यासारखी परळीसह बीड जिल्ह्यात गेली.एक चांगला सर्जन आणी माणुसकीचा माणुस गेल्याची भावना नागरिक व्यक्त होत आहे. परळी व परिस्थितीत अनेकांच्या अतिषय अवघड शस्त्रक्रिया करुन अनेकांना जिवदान देणारे डॉ रामेश्वर लटपटे यांचे निधन म्हणजे परळीकरांसठी मोठा धक्का आहे.
लटपटे परिवाराच्या दुःखात मराठवाडा साथी पीसीएन न्युज परिवार सहभागी आहे
दरम्उयान उद्या शुक्रवार दिनांक 05 जून रोजी सकाळी 8:30 वाजता परळी स्मशानभूमी येथे होणार आहे