Parli corona update: परळीसाठी मोठी बातमी; काल पाठवलेले 30 स्वॕब निगेटिव्ह
आज नव्याने 6 स्वॕब
त्या रुग्णाचा परळीत संसर्ग नाही
परळी वै….
परळी शहरातील जगतकर गल्लीत रहिवासी असलेली महिला रुग्ण औरंगाबाद येथे कोरोना पाॕझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती.
यामहिलेच्या संपर्कात आलेल्या 30 व्यक्तींचे स्वॕब घेण्यात आले होते.परळी उपजिल्हा रुग्णालयातुन 8 तर कोवीड-सेंटर येथे ठेवण्यात आलेल्या 22 व्यक्तींचे स्वॕब चा रिपोर्ट ही निगेटिव्ह आले असुन पुन्हा एकदा परळी भाग्यवानच म्हणावी लागेल.
परळी यापुर्वी दोन कोरोना पाॕझिटिव्ह रुग्णावर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात योग्य तो उपचार केल्याने त्या कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली होती.
जगतकर गल्लीत येथील एका महिला कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीने परळीत प्रशासन हादरुन गेले होते.जगतकर गल्लीचा परिसर कंटेन्मेट झोन जाहिर करुन त्या महिलेच्या संपर्कातील 30 व्यक्तींना आरोग्य प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांचे स्वॕब घेतले गेले.यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.परंतु परळीकरांच सुदैव की हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडुन मिळाली आहे.
उपजिल्हा रुग्णालय परळी वै.
दि.07/06/2020
आज घेतलेले स्वॕब….06
काल पाठवलेले स्वॕब….8
निगेटिव्ह……08
पाॕझिटिव्ह….00
प्रलंबित……00
आज पर्यत पाठवलेले एकुण स्वॕब 126
निगेटिव्ह ….124
पाॕझिटिव्ह ….02 (कोरोना मुक्त)
प्रलंबित …… 00