परळीकरांना मोठा दिलासा…!
एसबीआयच्या पाच कर्मचाऱ्यांनी केली कोरोनावर मात
परळी एसबीआय बॕंकेतील पाच कर्मचारी दि.4 जुलै रोजी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले होते.अंबाजोगाई येथील कोवीड-19 सेंटर येथे त्या पाचही जणांवर उपचार करण्यात आले होते.आरोग्य प्रशासनाने योग्य तो उपचार केल्याने त्या पाचही कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.आता त्यांना दि.13 जुलै रोजी डिस्चार्ज मिळाला आहे. एसबीआय बॕंकेतील कर्मचारी व संपर्कात आलेले नागरिक धास्तावले होते त्यांच्यासाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
अंबाजोगाई तालुका आरोग्य अधिकारी तथा अंबाजोगाई कोवीड-19 सेंटरचे समन्वयक डॉक्टर बालासाहेब लोमटे यांनी ही माहिती दिली.
परळीशहर व तालुक्यातील व्यापारी व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार परळीच्या एसबीआय शाखेत आहे. यामुळे साहजिकच हजारो नागरिकांची बॕँकेत ये-जा आहे.परंतु कोरोनाने बॕंकेतील पाच कर्मचाऱ्यांना संसर्ग केला आणी एकच खळबळ उडाली होती. आता त्या सुरुवातीला आढळुन आलेल्या पाच एसबीआय कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.