वैद्यनाथ’ ‘ मध्ये म . गांधी जयंतीदिनी प्लॉस्टिक मुक्तीचा संकल्प

परळी

वैद्यनाथ’ ‘ मध्ये म . गांधी जयंतीदिनी प्लॉस्टिक मुक्तीचा संकल्प
गांधी व्यक्ती नसून मानवतेची कृती – प्रा . डॉ . आचार्य
रक्तविरहित क्रांतीमुळे गांधीजी विश्वव्यापी – प्राचार्य . डॉ . इप्पर

परळी – वै: – वैद्यनाथ कॉलेज , राष्ट्रीय सेवा योजना , वाणिज्य विभाग यांच्या वतीने १५० व्या महात्मा गांधी जयंती निमित्ताने प्लॉस्टिक मुक्ती अभियान, फिट इंडिया , स्वच्छ भारत जनजागरण एक दिवशीय विविध उपक्रम राबविण्यात आले . याकार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आर . के . इप्पर यांनी उपस्थिती १५० एन . एस . एस स्वंयसेवकांना स्वच्छतेची शपथ दिली त्यावेळी म्हणून प्रमुख व्यक्ते प्रा डॉ . नयनकुमार आचार्य , उपप्राचार्य डॉ . जे . व्ही . जगतकर, आयोजक प्रा डॉ . माधव रोडे, प्रा डॉ . विरश्नी आर्या, प्रा . गयानागोराव मस्के मॅडम, न. प . स्वच्छता निरीक्षक एस व्ही . घाटे अदि . उपस्थिती होते .
यावेळी महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्वज्ञान डॉ . नयनकुमार आचार्य मार्गदर्शन करताना म्हणाले, सत्य , अहिंसा , नैतिकता, आणि सच्चचारित्र्य या महान तत्वांमुळे महात्मा गांधी ही केवळ न राहता मानवतेची आदर्श कृती ठरले, गांधीजीच्या तत्पानिष्ठ जीवनाचा व सामाजिक राष्ट्रीय , आध्यात्मिक विचारांचा आढावा घेतला . गांधीजींनी आधी केले मग सांगितले . या वचनानुसार मानवीय मूल्यांचा सर्व प्रथम अंगिकार केला . खडतर तपश्चर्या व त्याग पूर्ण जीवनाच्या बळावर जगातील मानवी मनावर सुसंस्काराचे अधिष्ठान निर्मिले . कार्यक्रमच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ . आर . के . इप्पर म्हणाले महात्मा गांधीजींनी रक्ताचा थेंब न सांडता सबंध जगाला क्रांतीकारी आंदोलनाची दिशा दिली त्यांची आदर्श मूल्यधिष्ठित विचारसरणी आज राष्ट्र निर्मिती करिता फार मोलाची आहे . गांधी भजन , कार्यक्रमात प्रस्ताविक रा . से . यो. समन्वयक प्रा . डॉ . माधव रोडे यांनी केले . तर सुत्रसंचलन प्रा . डॉ . एम . जी . लांडगे, तर आभार संदेश क्षिरसागर यांनी केले . कार्यक्रमात विशेष सहभाग प्रा . पी . के . कोपार्डे, प्रा मनोहर चाटे, प्रा उमेश कुरे, प्रा . संतोष सिरसाट, प्रा मोकळे मारूती . प्रा . गारोळे, अदि . , अंजली बळवंत, श्रध्दा स्वामी, वाघेश्र्वर मोती, प्रतिक्षा कराड, पौर्णिमा बारड, अर्शद सय्यद, ऐजाज पठाण, सय्यद करीम, मोईद, उबेद, फौजान , विवेक आघाव आदि केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *