प्राण्यांचा बळी देऊ नका – डॉ.गुट्टे महाराज दुर्गादेवी महात्म्य कथेत प्रतिपादन

परळी

प्राण्यांचा बळी देऊ नका – डॉ.गुट्टे महाराज
दुर्गादेवी महात्म्य कथेत प्रतिपादन

परळी । प्रतिनिधी
दि.०२/१०/२०१९

नवरात्रोत्सवानिमित्त परळी वैजनाथ येथील मोंढा मैदानात सुरू असलेल्या दुर्गोत्सवाच्या द्वितीय पुष्पात बोलताना स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी अंधश्रद्धा मानवी जीवनासह पर्यावरणाला कशाप्रकारे घातक ठरू शकते हे विविध वैज्ञानिक व अध्यात्मिक दाखल्याच्या आधारे स्पष्ट केले.
आज समाजात काही वाईट घटना घडली तर बकऱ्याचा, कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा वाढीसाठी आली आहे. मुळात प्राण्यांचा बळी दिल्याने कुठलाही देव प्रसन्न होत नाही. उलट त्याची हत्या केल्याच्या पापाचा बोझा आपल्यावर होतो बळी द्यायची इच्छा असेल तर मनातील वाईट विचारांचा बळी द्या देवीची मनोभावे पूजा,
आराधना करा, पूजेसाठी बळी देण्याची, फुल अथवा पान विड्याची गरज नाही. शुद्ध मनाने आराधना केल्याने ईश्वर प्राप्ती होते. देवीच्या पूजेने सगुण प्राप्त होऊन दुर्गुणांचा नाश होतो असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले याप्रसंगी सजीव देखावे व संगीताच्या लयबद्धतेने कार्यक्रमाला रंगत आली. महाराजांच्या सुमधूर वाणीने भाविकही मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले यावेळी संयोजक फुलचंद कराड, मा.पाटलोबा मुंडे, मा.श्रीमंत बोडके ऍड.आंधळे, संदीप आंधळे, प्रशांत कराड यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *