*रूढी, परंपरांना फाटा देत जाळी तांडा येथे शेतातच राख सावडण्याचा केला विधी*

परळी

*रूढी, परंपरांना फाटा देत जाळी तांडा येथे शेतातच राख सावडण्याचा केला विधी*

*बंजारा समाजातील जाधव कुटूंबियांनी उभा केला आदर्श*

*परळी/प्रकाश चव्हाण*
बुरसटलेल्या रूढी, परंपरांना फाटा देत बंजारा समाजात राख सावडण्याचा विधी शेतात करून अंत्यविधीच्या ठिकाणी आंब्याचे झाड लावून तेथेच सर्व विधी उरकण्यात आला.बंजारा समाजात वरचेवर जन्मापासून मृत्यू पर्यंतच्या विधीवर होणारा हजारो रूपयंाच्या खर्चाला यामुळे फाटा बसला आहे.
24 ऑक्टोबर रोजी परळी तालुक्यातील गोवर्धन येथील लिंबाजी खिराजी जाधव (वय 85) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना 3 मुले व 3 मुली आहेत. सुरूवातीपासूनच त्यांना शिक्षणाची आवड असल्याने घरातील सर्वांनाच चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मोठा मुलगा रामजी जाधव हा सामाजिक क्षेत्रात काम करतो. दुसरा मुलगा प्राध्यापक वसंत जाधव हा नोकरीनिमीत्त बीड येथे वास्तव्यास आहे तर तिसरा मुलगा शेती व्यवसायात रममान आहे. लिंबाजी जाधव यांनी आपल्या हयातीत समाजात असलेल्या अनिष्ठ रूढी, परंपरांना फाटा देत खर्चीक बाबी टाळत समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचा कायम प्रयत्न केला. त्यांच्या मुलांनी त्यांच्या निधनानंतर तो प्रयत्न प्रामाणिकपणे करीत आहेत. लिंबाजी जाधव यांच्या निधनानंतर 26 सप्टेंबर रोजी राख सावडण्याचा विधी होता. बंजारा समाजात वरचेवर अनिष्ठ रूढी, परंपरेचा मोठा पगडा पडत आहे. त्याचा आर्थिक फटकाही सगळयांनाच बसत आहे. परंतू गोवर्धन येथील जाळी तांड्यावर राख सावडण्याचा विधी शेतातच आटोपण्यात आला. सावडलेली राख शेतात पांगवून अंत्यविधी करण्यात आलेल्या ठिकाणी आंब्याचे झाड लावण्यात आले. त्या झाडाची जोपासणा करून भविष्यात त्यापासून सावली व फळे मिळतील या अपेक्षेने ते झाड लावण्यात आले आहे. शिवाय आपल्या वडिलांची आठवण या झाडापासून कायम होत राहील ही रास्त अपेक्षा त्यांची आहे. बंजारा समाज गावाच्या पासून अंतरावर तांडे करून राहतो. अपवादाने एखादा तांडा सोडला तर 99 टक्के तांड्यावर अद्यापपर्यंतही स्मशानभूमी नाही. त्यामुळे सर्वच तांड्यांवर अंत्यसंस्कार हे आपल्या स्वत:च्या शेतातच केला जातो. तसाच लिंबाजी जाधव यांच्यावर जाळी तांडा येथील स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे राख सावडण्याचा विधीही त्याच ठिकाणी उरकण्यात आला. राख शेतातच पांगविल्यामुळे दहा दिवसानंतर गंगेत केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *