*ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काॅ. उत्तम माने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात*

परळी

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काॅ. उत्तम माने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात*

*राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेल्या त्रासाचा हिशेब चुकता करणार – उत्तम माने*

*माफियागिरीला खतपाणी घालणाऱ्यांना घरी बसवा, तरूण आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध – ना. पंकजाताई मुंडे*

परळी दि. ०९ —–माफियागिरी आणि गुंडगिरीला खतपाणी घालणारा नेता हवा की विकासाला गती देणारा नेता हवा असा सवाल करून आगामी काळात तरूणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम करणार असुन याकामी आपण साथ द्यावी असे आवाहन राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्रासाला कंटाळून मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडून भाजपात प्रवेश करीत असुन आगामी काळात राष्ट्रवादीचे तीन तेरा वाजविणार असल्याचे सांगून विकासासाठी ना. पंकजाताई मुंडे यांना साथ द्या असे आवाहन उत्तमराव माने यांनी केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उत्तमराव माने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह यशश्री निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. सिरसाळा, पौळ पिंप्री, ममदापुर, मोहा, तेलसमुख,आचार्य टाकळी, कौडगाव घोडा येथील ग्राम पंचायत सदस्य तसेच सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी व शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी त्यांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ना. पंकजाताई मुंडे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मी विकासाचे राजकारण करते. आगामी काळात या भागातील तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग आणणार असुन त्याची सुरुवात दर्जेदार रस्ते करून केली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी सिंचन प्रकल्प वाढविणार आहे असे सांगून उत्तमराव माने यांनी भाजपात येताना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. मी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची लेक आहे. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, शेतमजूर आणि युवकांसाठी काम केले आहे. मीसुद्धा त्यांचा वसा आणि वारसा चालवित आहे असे सांगून मी विकासासाठी काम करणार आहे त्यामुळे आपण मला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. उत्तमराव माने आणि त्यांच्या सर्व सहकार्र्यांचा सन्मान केला जाईल असा शब्द त्यांनी दिला.

*राष्ट्रवादीचा हिशेब चुकता करणार- माने*
————————————-
परळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने माकप कार्यकर्त्यांना खुप त्रास दिला आहे. त्या त्रासाला कंटाळून मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडून सहकार्यांसह भाजपात प्रवेश केला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन तेरा वाजविणार असल्याची प्रतिज्ञा उत्तमराव माने यांनी केली. ना.पंकजाताई मुंडे यांची प्रामाणिकपणे विकास करण्याची धरपड व आश्वासक नेतृत्व असल्याने भाजपमध्ये प्रवेश केला असून “राष्ट्रवादीच्या भूल थापांना बळी न पडता ना.पंकजाताई सारख्या आश्वासक नेतृत्वाचे हात बळकट करून गुंडांचे पालनपोषण करणाऱ्या राष्ट्रवादीला हद्दपार करणार असल्याचे उत्तम माने यांनी सांगितले.
यावेळी उत्तमराव माने यांच्यासह दत्ता चव्हाण, राम बोरखडे, तुकाराम कदम, त्रिंबक कदम, प्रकाश आचार्य, अमोल वाघमारे, सिध्देश्वर वाघमारे, विवेक देशमुख, उध्दव जाधव, बलभीम वैराळ, प्रशांत देशमुख, अंगद पारेकर, कारभारी जाधव, शिवाजी देशमुख, रघुनाथ राठोड, ज्ञानेश्वर मुंडे, उत्तम पवार, प्रकाश उजगरे, भिमराव वाघमोडे, नानासाहेब चव्हाण, बाळासाहेब माने, आकाश वाघमारे, अंकुशराव माने, अशोक काळे, भिमराव कदम, अनिल माने, महादेव माने, विलास शिंगणे, जाकीराभाभी, विजय माने, रूस्तुम माने, वंदानाताई, शिवाजी माने आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याला खा. डॉ. प्रितमताई मुंडे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, सुखदेवराव मुंडे, रमेश कराड, दिनकर मुंडे गुरूजी, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, सतीश मुंडे, सुरेश माने, भारत सोनवणे, आश्रोबा काळे, मोहन आचार्य, युवानेते निळकंठ चाटे, प्रा. पवन मुंडे आदींसह भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *