*पुणे येथे डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते श्रम व रोजगार चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल वसंत मुंडे यांचा सत्कार*

परळी

*पुणे येथे डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते श्रम व रोजगार चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल वसंत मुंडे यांचा सत्कार*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नाशिक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या श्रम व रोजगार विभागाच्या चेअरमनपदी परळी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे वसंत मुंडे यांची निवड झाली. एम.आय.टी.पुणेचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन येतो चित्र येतो चित यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांनी पुढील कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

एम.आय.टी पुणे येथे वसंत मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. भारत सरकारच्या श्रम व रोजगार विभागा मार्फत नाशिक विभागाचे चेअरमन म्हणून निवड झाल्यामुळे एमआयटी पुणे येथे डॉ.विश्वनाथ कराड एम.आय.टी. चे अध्यक्ष यांनी त्यांच्या कार्यालयात एम.आय. टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रम व रोजगार विभागाचे संघटित असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवण्यास संदर्भात विविध प्रश्नावर सखोल अशी चर्चा करण्यात आली. यावेळी सत्कार सोहळ्यास माजी प्राचार्य सरकार निंबाळकर, जिल्हा उपनिबंधक सीएम बारी पुणे सतिश तिडके, मंगेश कराड, धनंजय राख, बालाजी मुंडे, विवेक देशपांडे, चंदू मुंडे इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *