पंकजाताई मुंडे यांनी केला प्रा. टी.पी. मुंडे यांचा सन्मान,अमित शहा यांच्याशी करून दिली विशेष ओळख!

महाराष्ट्र

“ये मेरे काका है, ईन्होने दो बार मेरे खिलाफ चुनाव लढा लेकीन अभी ओ अपने साथ है” ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अशी ओळख जेष्ठ नेते प्रा.टी.पी. मुंडे यांची करून देताच केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि “अरे ये तो बहोत अच्छे नेता है “असे म्हणत त्यांचे कौतुक केले आणि” आपका सम्मान होगा “असा शब्दही दिला. लेकीने वाढवलेल्या सन्माने प्रा.मुंडे भारावून गेले.निमित्त होते भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याचे! नुकतेच भाजपसोबत आलेले जेष्ठ नेते प्रा. टी.पी. मुंडे हे मेळाव्यासाठी सावरगाव घाट येथे हेलीपॅडवर आले असता सर्व नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचे स्वागत केले.यावेळी पंकजाताई मुंडे यांनी प्रा. टी.पी.मुंडे यांना जवळ बोलावून घेत त्यांची ओळख करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *