*भाजपा सरकारनेच मातंग समाजाला न्याय दिला – ना. पंकजाताई मुंडे*

परळी

*मातंग समाज मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद, महिलांची मोठी उपस्थिती*

*भाजपा सरकारनेच मातंग समाजाला न्याय दिला – ना. पंकजाताई मुंडे*

*भ्रष्टाचार करून अण्णाभाऊंचे नाव बदनाम करणार्‍या राष्ट्रवादीला धडा शिकवा – अमित गोरखे*

परळी वैजनाथ दि. ०९ —-मातंग समाजाच्या हितासाठी भाजपा अनेक चांगले निर्णय घेवून न्याय दिला आहे. आगामी काळात समाजातील युवकांना शासक बनवण्यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माध्यमातून काम करण्यात येणार असून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मातंग समाजाने माझ्या पाठीशी ताकद उभी करावी असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. भ्रष्टाचार करून अण्णाभाऊ साठे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसने बदनाम केले असून या निवडणुकीत त्यांना धडा शिकवा आणि ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले. मेळाव्याला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

भाजपा – शिवसेना – रिपाइं – रासप – रयत क्रांती सेना महायुतीच्या परळी विधान सभेच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ अक्षदा मंगल कार्यालयात मातंग समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर समाजासाठी संघर्ष केला मीसुद्धा तुमच्या विकासाची भूमिका घेऊन काम करीत आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. विकासाच्या सोबतच तुमच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी मी काम करीत आहे. राष्ट्रवादीचे लोक केवळ फोडाफोडी आणि आपसात भांडण लावण्याचे काम करतात. त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली ताकद माझ्या पाठीशी उभी करून आशिर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

*राष्ट्रवादीला धडा शिकवा – अमित गोरखे*

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मदत करण्याऐवजी राष्ट्रवादीने भ्रष्टाचार करून अण्णाभाऊंचे नाव बदनाम केले आहे म्हणुन समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवावा असे आवाहन करून समाजाच्या हितासाठी ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले.
ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री यांना सांगुन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या समाजासाठी 27000 हजार घरे दिली आहेत. आगामी काळात समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ना. पंकजाताई मुंडे यांनी नेहमीच आपल्या समाजाच्या हिताला प्राधान्य दिले आहे असे सांगून आपला समाज स्वाभिमानी आहे समाजाने आमिषाला बळी न पडता आपले मतदान हे ना. पंकजाताई मुंडे यांना देऊन ऐतिहासिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
गोरगरीब जनतेच्या विकासासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी काम केले आहे. आगामी काळातही त्याच आपला विकास करणार आहेत असे सांगून आपली लेक पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अशा मोठ्या माणसांच्या सोबत व्यासपीठावर बसते तिला खाली अडचण निर्माण करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून द्या आणि ना. पंकजाताई मुंडे यांना साथ द्या असे आवाहन जेष्ठ नेते प्रा. टी.पी. मुंडे यांनी केले.
यावेळी उत्तमराव माने यांनीही ना. पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर भा.ज.पार्टीचे प्रदेश चिटणिस राजेश देशमुख ,जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, मोहन जगताप, मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुधाकर पौळ, दत्ता देशमुख, सतीश मुंडे, प्रभाकर वाघमोडे, सुर्यकांत मुंडे, गंगाधर रोडे, सुरेश माने, प्रा. संपत वाघमोडे, तानाजी व्हावळे, जितेंद्र मस्के, विक्रम मिसाळ , बबन कसबे , सुनील मस्के , अभिमान मस्के , मुरलीधर पारवे , मुना मस्के गणेश मस्के ,राजेश कांबळे, बाळु सुरवसे , किरण सगट आदींची उपस्थिती होती.
या मेळाव्याला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *