*पीक विम्यासाठी मी आंदोलन केले म्हणूनच पीक विमा मिळाला- धनंजय मुंडे*

परळी

*पीक विम्यासाठी मी आंदोलन केले म्हणूनच पीक विमा मिळाला- धनंजय मुंडे*

*_परळीला आता खंबीर नेतृत्वाची गरज- पंडीतराव दौंड_*

परळी वै. दि.09………….. संपूर्ण बीड जिल्ह्याला पीक विमा मिळतो मात्र मंत्रीपद, पालकमंत्रीपद असूनही परळी, अंबाजोगाई या आपल्या तालुक्याला ज्यांना साधा पीक विमा मिळवून देता येत नाही, असे लोकप्रतिनिधी काय कामाचे ? असा सवाल करत मी आंदोलन केले म्हणूनच पीक विमा मिळाल्याचा दावा विरोधी पक्षनेते धनंजय मुंंडे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ मुंडे यांनी आज खोडवा सावरगाव येथे जाहीर सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. परळीला आता धनंजय मुंडेंसारख्या खंबीर नेतृत्वाची विकासासाठी गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री पंडीतराव दौंड यांनी केले. 

यावेळी कृ.उ.बा.समिती सभापती अ‍ॅड.गोविंद फड, बालाजी बालटे, वैभव दहिफळे, मारोती कांबळे, दिपक कांबळे, सागर कांबळे, सुधाकर दहिफळे, ओमकेश दहिफळे, श्रीरामदहिफळे, लहूदास दहिफळे आदींसह गावातील कार्यकर्तेे, पदाधिकारी उपस्थित होते. 

खो. सावरगावला मी नेहमीच येतो, मात्र आज या गावामध्ये बदल दिसून येत आहे. तुमच्या प्रत्येक अडी-अडचणीच्या काळात मी धावून आलो आहे, मतदारासंघातील माणसाला अडचणीच्या काळात माझी आठवण होते, हा माझ्यासाठी बहूमान आहे. माझ्या आंदोनलामुळे पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी, आजही सर्व शेतकर्‍यांना पीक विमा मिळालेला नाही, त्यासाठी आपण पुन्हा संघर्ष करू, तुम्ही फक्त मतदानरूपी आशीर्वाद द्या असे ते म्हणाले.

*अनेकांचा प्रवेश*

या कार्यक्रमात लिंबाजी दहिफळे, बाळू हंगे, पप्पु, ज्ञानोबा, सिध्देश्वर बालाजी, विष्णु माळवे, सुशिल दहिफळे, आकाश बंडू, पप्पु आटूळे, बाळू दहिफळे, धनराज आढाव, फकीर शेख, विलास दहिफळे, परमेश्वर आटुळे, चंद्रकांत सरवदे, उमेश दहिफळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *