*परळी ते श्री.क्षेत्र कपीलधार पदयात्रा परळीहून मार्गस्थ* *पदयात्रेचे १९ वे वर्षे*

परळी

*परळी ते श्री.क्षेत्र कपीलधार पदयात्रा परळीहून मार्गस्थ*
*पदयात्रेचे १९ वे वर्षे*

परळी वैजनाथ दि.०६(प्रतिनिधी)
श्री.क्षेत्र कपीलधार येथे कार्तिक पोर्णिमेला मन्मथ स्वामी यांची यात्रा असते.या यात्रेनिमित्त येथून मागील १८ वर्षांपासून पदयात्रा काढण्यात येते. यंदा पदयात्रेचे १९ वे वर्ष आहे.
दरवर्षी कार्तिक पोर्णिमेला विरशैव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्री.क्षेत्र कपीलधार येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रासह,आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून पदयात्रेने विरशैव भाविक भक्त लाखोंच्या संख्येने सहभागी होत असतात. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून गेल्या १८ वर्षांपासून पदयात्रा काढली जाते. सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रेरणेतून व दिवंगत गुरुलिंग मेनकुदळे, गणपत साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ हालगे, नागनाथ वाघमारे, वैजनाथ कोरे,जगदीश चौधरी, दयानंद चौधरी, विश्वनाथ वाघमारे, सदाशिव सुगरे, राजाभाऊ हलकंच यांनी या पदयात्रेची सुरुवात केली. या पदयात्रेचे हे १९ वे वर्षे आहे.बुधवारी (ता.०६) दुपारी शहरातून पदयात्रा मार्गस्थ झाली. सेलू,दिंद्रुड,वडवणी, ढेकणमोहा,पाली व श्री.क्षेत्र कपीलधार येथे सोमवारी (ता.११) पोहचार आहे. या यात्रेत परळीसह पंचक्रोशीतील महिला, पुरुष भाविक भक्त सहभागी होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *