प्रा.डॉ.मधुकर आघाव यांच्या तलाव गळतीच्या आंदोलनाला यश

परळी

प्रा.डॉ.मधुकर आघाव यांच्या तलाव गळतीच्या आंदोलनाला यश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परतीच्या पावसामुळे परळी तालुक्यातील छोटे मोठे तलाव पाण्याने भरले असुन तलावातील हे पाणी शेतकर्‍यांच्या किंवा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी ठरण्याची शक्यता कमी आहे. या तलावातुन मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याने पाण्याची नासाडी होत असुन ही गळती त्वरीत थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जि.प.सदस्य प्रा.डॉ.मुधकर आघाव यांनी दिला होता येथील पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेऊन गळती होत असलेली तलावाची दुरुस्तीचे काम हाती घेतले असुन आघावसरांच्या आंदोलनाला यश आले आहे.

तालुक्यातील बोरणा मध्यम प्रक्लप, चांदापुर व गुट्टेवाडी या प्रकल्पातुन सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती. गतवर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात या तलावात अत्यल्प पाणीसाठा होता. त्यावेळी पाटबंधारे विभागास गळती होणारे पाणी रोखण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना कराव्यात या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे काढणीस आलेले पिक वाया गेले असले तरी तलावातील पाण्यामुळे पुढील हंगामातील पिक घेता येईल अशी आशा निर्माण झाली आहे. या बरोबरच संकटकाळी पाणी पुरवठ्यासाठी या तलावातील पाणीसाठा उपयुक्त आहे. परंतु तलावातुन होत असलेल्या गळतीमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत होता परंतु आज पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता गोरे साहेब व तसेच इतर सहकारी व प्रा.डॉ मधुकर आघाव यांनी वाण धरणाची पाणी गळती आज पूर्ण पणे बंद केली आहे आघावसरांच्या आंदोलनाला यश आले आहे या यशस्वी आंदोलनाचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *