*महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी सक्षम-सौ.संगिताताई तुपसागर*

बीड

*महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी सक्षम-सौ.संगिताताई तुपसागर*

अंबाजोगाई…[प्रतिनिधी]

अंबाजोगाई शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्हाअध्यक्षा सौ,संगिताताई तुपसागर यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ अंजली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी बीड जिल्ह्यात सक्षम काम करणार असल्याचे प्रतिपादन संगिताताई तुपसागर यांनी केले.
अंबाजोगाई तालुक्यातील राष्ट्रवादी महिला आघाडीची आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्षपदी येथील सौ.अंजली पाटिल यांचा निवडीचे पञ देऊन जिल्हाध्यक्षा संगिताताई तुपसागर यांनी सत्कार केला.या बैठकीला तालुक्यातील राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी,सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सौ.अंजली पाटिल यांच्या पुढील सामाजिक व राजकीय कारकिर्दीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *