एस.एम.देशमुख यांचा उद्या परळीत सत्कार

परळी

एस.एम.देशमुख यांचा उद्या परळीत सत्कार

परळी (प्रतिनिधी-)
पत्रकार हल्ला विरोधी कायद्यास मंजूरी मिळावी
यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्षरथ
राहीलेले एस.एम. देशमुख यांच्यासह
मान्यवरांचा परळी येथे सोमवार दि. १८ रोजी
सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या
कार्यक्रमास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उप
स्थित रहावे, असे आवाहन संयोजन
समितीच्या वतीने करण्यात आले
आहे.पत्रकार हल्ला विरोधी कायद्यास मंजूरी
मिळावी यासाठी एस.एम. देशमुख यांनी २०११ पासून
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून
राज्यभर पत्रकारांमध्ये जनजागृती व संघटना बांधणी
केली. पत्रकारांचे राज्यभरात लढे व आंदोलने करुन
शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या मागणीस राज्यातील १८०
आमदारांनी पाठींबा देत कायद्यात रुपांतर
करण्यासाठी प्रयत्न केले. राज्याच्या दोन्ही
सभागृहात ७ एप्रिल २०१७ रोजी पत्रकार हल्ला
विरोधी कायदा मंजूर करून घेतला.हा कायदा
मंजूर झाल्याबद्दल एस.एम. देशमुख, अनिल
महाजन, सुभाष चौरे यांचा परळी येथील साथी
सभागृहात सोमवार दि. १८ रोजी दु. ४ वा.
पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात येणार
आहे. या कार्यक्रमास पत्रकारांसह नागरिकांनी मोठ्या
संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन
समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *