दुष्काळी उपाय योजना राबवण्यात शासन अपयशी- तुळशीराम पवार

पाटोदा

जिल्ह्यातील दुष्काळाची तिव्रता वाढली आहे. अनेक गावे या दुष्काळ परिस्थितीतील सामना कसा करायचा या चिंतेत आहे. सध्या सर्वत्र पिण्याचे पाणी, जनावराचे पाणी, चारा, टंचाई, जानवत असून या सर्वावर उपाय योजना करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु या योजना राबविण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार यांनी केला आहे.
सध्या परळीसह बीड जिल्ह्यात कमी पावसामुळे भिषण दुष्काळ आहे. अशा काळात शासनाच्या दुष्काळी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. यात जनावरांना चारा अनुदान, दावनीला चारा, छावणी अशा योजना तातडीने हातात घेणे आवश्यक आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी दुष्काळग्रस्त भागामध्ये एैन दिवाळीत स्वस्त धान्य दुकानांना धान्य उपलब्ध झाले नसल्याने जनतेच्या मुखात धान्य गेले नाही. या सर्व योजनांना शासन जबाबदार असून येणार्‍या काळात दुष्काळी योजना प्रभावी पणे राबविल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *