ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर

पाटोदा

यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समिती अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर यांना जाहिर झाला असून पुरस्काराचे वितरण 27 नोव्हेंबरला अंबाजोगाई येथे होत असलेल्या स्मृती समारोह कार्यक्रमात होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर यांच्या ग्रंथ संपदा व साहित्याचा सन्मान म्हणून अंबाजोगाईतील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने त्यांचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी या पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहचे हे 34 वे वर्ष असून या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर यांना दिला जाणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी सायं.5 वा. एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्कारोच स्वरुप आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *