वडगाव पाटीवर वाहनाच्या अपघातात एक महीला जागीच ठार

देश-विदेश
Spread the love

वडगाव पाटीवर वाहनाच्या अपघातात एक महीला जागीच ठार.
गंगाखेड/ प्रतिनिधी
गंगाखेड ते परळी रोडवर वडगाव पाटीवर महीला शेतकरी रस्ता ओंलाडत असतांना भरधाव वेगात येणाऱ्या जीपने जोराची धडक दिल्याने महीला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

गंगाखेड ते परळी रोडवरील वडगाव पाटी जवळ आज दि.१९ रोजी दुपारचा वेळेत वडगाव येथील महिला शेतकरी गोदावरी मनोहर बचाटे वय ६५ हि शेतात जाण्यासाठी रस्ता ओलांडीत आसताना परळी वरून भदाधाव वेगात येणाऱ्या एम एच यु ०९७० जीपची जोराची धडक बसल्याने शेतकरी महीला गोदावरी बाई बचाटे ही जागीच ठार झाली असुन सदर महीलेचे शव गंगाखेड उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून कुंटुबाकडे देण्यात येउन जीप चालकावर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *