जिल्ह्यातील बर्ड फ्लू चा उद्रेक नियंत्रित करण्याकरिता प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

बीड
Spread the love

*जिल्ह्यातील बर्ड फ्लू चा उद्रेक नियंत्रित करण्याकरिता प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन*
बीड / प्रतिनिधी
फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, राज्यस्थान या राज्यांतील स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत, त्यासंदर्भात विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, सोशल मिडियांवरुन बातम्या व माहिती प्रसारित होत आहे.त्याअनुषंगाने माध्यमांना याबाबतीतील अद्यावत अधिकृत माहिती देणेसाठी प्रस्तुत प्रेस नोट देण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील मुगगाव तालुका पाटोदा येथे दिनांक 07 जानेवारी 2021 रोजी 11 कावळे मृत स्थितीत आढळून आले. त्यापैकी कावळयांचे शव रोग निदानासाठीी, रोग अन्वेषण विभाग, पुणे मार्फत NISHAD, भोपाळ येथे पाटविण्यात आले होते. सदरील नमुने बर्ड फ्लू (H5N8) पॉझिटिव्ह आले आहे. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत असून,
तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
यासंदर्भात सर्व पोल्ट्री धारक व सर्व सामान्य जनतेस कळविण्यात येते की, जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे, किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये गर्नुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यवसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मरुक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती द्यावी.

*मृत पक्षास हात लावू नये, शव विच्छेदन करु नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये.*

प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या कलम 4 (1) अन्वये प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशपालक ज्यांना नमुद कायद्याशी
संलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजीकच्या ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व ही माहिती नजीकच्या उपलब्ध पशुवैद्यकीय दवाखाण्यास लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी.

बर्ड फ्लू चा झालेला उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

परंतू अंडी व कुक्कुट मांस किमान 70°C तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री
मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे.
बर्ड फ्लू रोगाबद्दल शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, अशी सर्व जनतेस कृपया आपल्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *