मिलिंद विद्यालयात एस.एस. सी.बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना परिसंवाद संपन्न

पाटोदा

आज दिनांक 3 फेब्रुवारी रविवार रोजी परळी वै. येथील मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या नविन अभ्यासक्रमावर आधारित कृतिपत्रीके विषयी इंग्रजी विषयतज्ञ श्री. अमोल कांबळे सरांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिलिंद विद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती वर कार्यरत असलेले इंग्रजी विषयतज्ञ परळीतील न्यु हायस्कूल शाळेतील सहशिक्षक श्री. अमोल कांबळे सरांनी 10 वी च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या नविन कृतिपत्रीके विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. अनिल केंद्रे सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ रोडे सर, कलिम सर, चव्हाण सर , शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार के.एन., पर्यवेक्षक श्री. कोमावार सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शौकत पठाण सर यांनी केले तर आभार श्री. कोमावार सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. नितीन व्हावळे सर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *