देव तुमच भल करो* *आरोग्य तपासणी शिबिरातील भिक्षुक भारावले*

पाटोदा

“देव तुमचं भलं करो” अशी आर्त हाक आज एका भिक्षुकाने श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट व परळी मेडिकल असोसिएशन द्वारा जागतिक आरोग्य दिना निमित्त आयोजित भिक्षुकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिरात दिली
सविस्तर वृत्त असे की सात एप्रिल हा दिवस जगभरात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून परळी परिसरातील भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या भिक्षुकांसाठी एका आगळ्यावेगळ्या “भिक्षुक आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन” श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या अन्नछत्र हॉलमध्ये करण्यात आले होते.
माता अन्नपूर्णा व धन्वंतरी देवतेचे पूजन करून या शिबिराला शुरुवात झाली. ट्रस्टचे श्री रामगोपाल लाहोटी व सचिव संजय स्वामी यांच्यासमवेत परळी मेडिकल असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीनारायण लोहिया व सचिव डॉक्टर दीपक मुंडे समवेत डॉक्टर वंगे, डॉक्टर आर बी जाजू हे व्यासपीठावर उपस्थित होते
अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे उपस्थित सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ लोहिया यांनी अन्नपूर्णा ट्रस्ट च्या निराश्रितासाठीच्या आरोग्य संबंधी सर्व कार्यात परळी मेडिकल असोसिएशन सदैव सोबत राहील असे सांगुन या आगळ्यावेगळ्या शिबिरा बद्दल ट्रस्टचे कौतुक केले. डॉक्टर दीपक मुंडे यांनी या कार्यक्रमाला सहकार्य दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले. ट्रस्ट तर्फे मनोगत व्यक्त करताना ट्रस्टचे कोऑर्डिनेटर राकेश चांडक यांनी परळी मेडिकल असोसिएशनने एका शब्दावर या कॅम्प मध्ये सेवा देण्याची तयारी दाखविली व आज हे सामाजिक कार्य पार पाडून डॉक्टर वर्गांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल गौरवोद्गार काढले, अन्नपूर्णा ट्रस्टच्या सामाजिक कार्याची सविस्तर माहिती त्यांनी सर्व डॉक्टर वर्गांना दिली.
आज या शिबिरामध्ये जवळपास 55 भिक्षुकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला असून अन्नछञ हॉल येथे त्यांना औषधोपचार देण्यात आले. या शिबिरात रुग्णांची डोळ्याची तपासणी देखील करण्यात आली असून त्यापैकी आठ रुग्णांना डोळ्यांच्या ऑपरेशनची नितांत आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले असता लवकरच अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांचे ऑपरेशन करून दिले जाईल अशी ग्वाही ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लाहोटी यांनी दिली. आलेल्या सर्व रुग्णांना ट्रस्ट मार्फत मिल्टन कंपनी च्या पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या.
सदर कार्यक्रम सुरू असताना वातावरण खूप भावविभोर झाले होते. त्यातच एक पाऊल पुढे उचलून परळी मेडिकल असोसिएशन द्वारे त्या 50 ते 55 भिक्षुकांना ज्यांना अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे रोज जेवण दिले जाते अश्या सर्व भिक्षुकांची दर महिन्याला फेर तपासणी करीत राहण्याचे आश्वासन दिले.
तपासणी शिबिरात डॉ दे घ मुंडे, डॉ सूर्यकांत मुंडे, डॉ विवेक दंडे, डॉ मधुसूदन काळे, डॉ अशोक लोढा, डॉ ज्ञानेश्वर घुगे, डॉ शालिनी कराड, डॉ मुकुंद सोळंके, डॉ माया समशेटे, डॉ राजाराम मुंडे, डॉ सतीश गुट्टे, डॉ दत्तात्रेय पाळवदे , डॉ शिवकांत अंदुरे, डॉ आनंद टिंबे, डॉ वृषाली सोळंके, डॉ सौ लोहिया, डॉ रंजना घुगे, डॉ झंवर , डॉ रांदड़ , डॉक्टर बाहेकार, डॉ कांकरिया, डॉ तुषार पिंपळे, आदि समवेत परळी शहरातील नामांकित डॉक्टर वर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्ट तर्फे श्री कचरू लाल उपाध्याय, श्री उमेश टाले, श्री शिवराज उदगीरकर, श्री स्वप्नील सावजी, श्री गोपाल टावरी, श्री बसवराज रोडे, किशोर स्वामी, अमोल मुंडे, दत्ता शेटे, शेख अन्वर, ईश्वर बावणे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला त्यात परळी मेडिकल असोसिएशन तर्फे डॉक्टर संदीप घुगे तर अन्नपूर्णा ट्रस्ट तर्फे सचिव संजय स्वामी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *