खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब सोमवारी बीड जिल्ह्यात* *_शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद ; चारा छावण्यांनाही देणार भेट

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री ,खा.श्री.शरदचंद्रजी पवार हे सोमवार दि.13 मे, 2019 रोजी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच गुरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणीही करणार आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या […]

उर्वरित वाचा

बीडमध्ये भाजपने सोडला निश्वास, प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले

बीड लोकसभा निवडणुकीसाठी 59 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी या उमेदवारांची छाननी होती. त्या दरम्यान अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले. या आक्षेपावर दुपारी चार वाजता सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीत प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवरील आक्षेप अखेर फेटाळण्यात आले. तोपर्यंत मात्र बीड जिल्ह्यातील संपूर्ण […]

उर्वरित वाचा

परळी भुषण पुरस्कारांचे 7 फेब्रुवारीला वितरण ना.धनंजय मुंडे, हास्यसम्राट बण्डा जोशी, सौ. हालगे यांची उपस्थिती

दै.मराठवाडा साथीच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या परळी भुषण पुरस्कारांचे दि.7 फेब्रुवारी रोजी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते ना. धनंजय मुंडे, प्रसिद्ध हास्य कलावंत बण्डा जोशी (पुणे), नगराध्यक्षा सौ. सरोजिनीताई हालगे व संपादक चंदुलाल बियाणी यांच्या उपस्थितीत होत असून याच कार्यक्रमात बाल धमाल स्पर्धा 2019 चे बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती मराठवाडा साथी परिवाराच्या […]

उर्वरित वाचा

स्वच्छता स्पर्धेचा फार्स, सहा लाखाचा चुराडा

जिल्ह्यातील पंधरा गावांची निवड करून त्यांची स्वच्छता स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी वार्ड निहाय स्पर्धा घेवून बक्षीस घेण्यात येणार आहे. मात्र गावामध्ये वार्डच परिपूर्ण नाही. तरीही ही स्पर्धा घेण्याचा फार्स चालू असून त्यासाठी परिक्षकांच्या कार्यशाळेसाठी सहा लाख रूपयांचा चुराडा होणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी २० हजारापासून १ लाखपर्यंत निधी दिला जाणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये स्वच्छता अभियान […]

उर्वरित वाचा

शिक्षण महर्षी स्व.शामराव (दादा) गदळे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी, आदर्श शिक्षक पुरस्कार व किर्तन सोहळ्याचे आयोजन

उर्वरित वाचा

खाजगी रूग्णालयाची वाट न धरता शासकिय रूग्णालयात वैद्यकिय सेवा घ्यावी -डॉ.अशोक थोरात

परळी शहर आणि तालुक्यातील रूग्णांसाठी परळी उपजिल्हा रूग्णालय हा एकमेव वैद्यकिय आधार असून या रूग्णालयातील लहान मोठ्या सर्वच तक्रारी दुर करण्यासोबत रिक्त असलेली डॉक्टरांची पदे भरणे, शस्त्रक्रियात वाढ करणे, रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवून विविध आरोग्य योजना राबविण्यावर आपला भर असून येत्या काळात आवश्यक असलेल्या सर्व वैद्यकिय सेवांनी परळीचे उपजिल्हा रूग्णालय परिपूर्ण झालेले दिसेल असे मत […]

उर्वरित वाचा

राखेचे प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांवर होणार कठोर कारवाई -गणेश महाडीक

मराठवाडा साथी आणि मराठवाडा साथी पीसीएन न्युज परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही संवाद प्रशासनाशी हा अनोखा मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची मुलाखती घेण्यात येत आहेत. आज या संवाद कार्यक्रमाचा शुभारंभ झाला असून, सकाळच्या सत्रात परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीच्या सुरूवातीस उपविभागीय अधिकार्‍यांच्या हस्ते […]

उर्वरित वाचा

उद्याच्या भारत बंद मध्ये परळीकरांनी सहभागी व्हावे पुरोगामी विचारांच्या पक्षांचे आवाहन-काँग्रेस

देशातील वाढती महागाई, दररोज होणारी पेट्रोल व डिझेल दरवाढ यासह जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा मागण्यांसाठी काँग्रेससह, माकप, शेकाप, मनसे, एकतावादी रिपाइं, सपा, बसपा,स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींनी पुकारलेल्या आजच्या सोमवार दि 10 सप्टेंबर च्या भारत बंदमध्ये परळी शहर व तालुक्यातील नागरीक, व्यापारी, शैक्षणिक संस्था, आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे यासंदर्भात कॉंग्रेस व पुरोगामी विचारांच्या पक्षाच्या […]

उर्वरित वाचा

वै.प्रा.हरिश्‍चंद्र पंडितराव गित्ते यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ना.पंकजाताई मुंडे,खा.प्रितमताई मुंडे व यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मान कर्तृत्वाचा गौरव पुरस्काराचे आज होणार वितरण

वै.प्रा.हरिश्‍चदद्र पंडितराव गित्ते यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री शिवलीलामृत कथेची सांगता व राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याणमंञी ना.पंकजाताई मुंडे,खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते सन्मान कर्तृत्वाचा गौरव पुरस्काराचे आज रविवार दि.12 आॕगस्ट रोजी वितरण कार्यक्रम होणार असुन व याप्रसंगी महाप्रसादासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत राहुन लाभ घ्यावा असे आवाहन हरिसुखप्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेश गित्ते केले […]

उर्वरित वाचा

उत्कृष्ट कामगिरीबाबत परळीच्या पोलिसांचा गौरव

राज्यभरात परळीतील मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद उमटून मराठा आरक्षणासाठी उग्र आंदोलने झाली. परंतू या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेल्या परळीत मात्र अतिशय शांततेत गेल्या महिनाभरात आंदोलने झाली आहेत. 21 दिवसांच्या ठिय्या आंदोलनानंतर 9 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या दिवशीही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे बीड जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते आंदोलनकाळात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या पोलिस […]

उर्वरित वाचा