गेवराई येथे दरोडेखोरांनी एका घरात घुसून वृद्ध महिलेचा गळा दाबून खून

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दरोडेखोरांनी एका घरात घुसून वृद्ध महिलेचा मोबाइल चार्जरनं गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. तसंच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पाच लाख रुपये किंमतीचा ऐवज लुटून पोबारा केला. खडकपुरा भागातील खक्का मार्केट परिसरातील एका घरावर रविवारी रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातील सोने व चांदीच्या दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल लुटला. […]

उर्वरित वाचा

वैद्यनाथ बँक गेवराई शाखा नियोजित इमारत भूमिपूजन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न

दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड परळी वैजनाथ शाखा गेवराई च्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन आज दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी बीड जिल्ह्याच्या माननीय खासदार तथा वैद्यनाथ बॅंकेच्या संचालिका मा.खा.डॉ. प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या नियोजित इमारत भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन मा.श्री अशोक जैन होते तर प्रमुख अतिथी म्हणून गेवराई मतदार संघाचे […]

उर्वरित वाचा

ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे गेवराई शहरात सीसीटीव्ही कॅमेरासाठी ८० लाखाचा निधी

_जिल्हा नियोजन मंडळाच्या योजनेस गृहखात्याची मान्यता; टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हयात योजना राबवली जाणार_ — राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे गेवराई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गृह विभागाने ८० लाख रूपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून नियोजन मंडळाने हा प्रस्ताव सादर केला होता, कॅमेरे बसविण्याची योजना टप्प्याटप्प्याने संपूर्ण […]

उर्वरित वाचा

मयत ऊसतोड कामगार महिलेच्या कुटूंबियांचे धनंजय मुंडे यांचेकडून सांत्वन

दहा लक्ष रुपयांची शासकीय मदत मिळवून दिली ————————————— – तालुक्यातील मौजे सावरगाव येथील मयत निता बांगर या ऊसतोड कामगार महिलेचा शिवशाही बसच्या धडकेमुळे रस्ते अपघातात मृत्यु झाला होता. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी गेलेल्या या महिलेच्या मृत्युची बातमी समजल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तत्परतेने सातारा पोलिस, परिवहन विभागाचे अधिकारी आणि मंत्री यांच्याशी […]

उर्वरित वाचा

महसुल कर्मचार्‍यांचे परळीत लेखणी बंद आंदोलन

जातेगाव, ता.गेवराई येथे वाळू माफीयांनी तलाठ्यास केलेल्या मारहाणीचा आज परळीत महसुल कर्मचार्‍यांनी निषेध नोंदवला. सर्व कर्मचार्‍यांनी आज लेखणी बंद आंदोलन केल्याने सर्व कामे ठप्प झाली होती. घडलेली घटना ही गंभीर असून, त्यातील दोषींवर कडक कारवाई करावी असे निवेदनही उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांना देण्यात आले. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे कर्तव्यावर असलेले तलाठी विठ्ठल आमलेकर यांना […]

उर्वरित वाचा

रिक्त असलेल्या जागेच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय, गढी येथे परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालय, गढी येथे इयत्ता 9 वी मधील रिक्त असलेल्या जागावरील प्रवेश देण्यासाठी दि. 19 मे 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता जवाहर नवोदय विद्यालय, गढी येथे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन फार्म भरलेल्या विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी. व परीक्षासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 9.30 वाजता उपस्थित रहावे. या परीक्षा प्रवेश पत्रासाठी […]

उर्वरित वाचा