लातूरमध्ये टेम्पो आणि अॅपे रिक्षाचा भीषण अपघात, एकाच परिवारातील पाच जणांचा मृत्यू

लातूर : जांब ते शिरुर मार्गावरील चेरा पाटीजवळ कडब्याने भरलेला टेम्पो आणि लग्नाहून परतणाऱ्या अॅपे मॅजिकची समोरासमोर टक्कर होऊन त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तर सहा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जळकोटच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करुन रूग्णांना उदगीर येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडला. […]

उर्वरित वाचा

ना. पंकजाताई मुंडे यांचा नांदेड, लातूर जिल्हयात झंझावाती दौरा ;दोन दिवसांत अडीच लाख लोकांशी साधला संवाद

राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांपैकी एक असलेल्या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मागील दोन दिवसांत नांदेड आणि लातूर जिल्हयात झंझावाती दौरा केला. या दोन्ही ठिकाणी झालेल्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सुमारे अडीच लाख लोकांशी संवाद साधला. रविवारी नांदेड जिल्हयातील माळेगांव येथे ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर आरक्षण जागर महामेळावा […]

उर्वरित वाचा

*ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते औसा पंचायत समितीच्या इमारतीचे थाटात लोकार्पण

— कुठलाही भेदभाव न करता केवळ जनतेच्या सोयीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आम्ही प्रभावीपणे राबवित आहोत. आज या योजनेमुळे ग्रामीण भागात सर्वत्र दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्याने याठिकाणचा मागासलेपणा दूर होण्यास मदत झाली आहे असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितले. औसा पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण ना […]

उर्वरित वाचा

कामगार नाट्य स्पर्धेत परळीच्या ‘येडी बाभळ’ प्रथम तर ‘रंग दे बसंती’ ला द्वितीय पारितोषिक ; प्रदीप भोकरे यांना लेखक व दिग्दर्शनाचे पहिले बक्षीस

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालय लातूर तर्फे आयोजित महिला नाट्य स्पर्धेत परळीच्या महर्षी कणाद विद्यालयाच्या संघाने रंगकर्मी प्रदीप भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येडी बाभळ हे नाटक सादर केले होते. कामगार कल्याण मंडळाच्या महिला नाट्य स्पर्धेत ‘येडी बाभळ’ या एकांकिकेला सांघिक प्रथम पारितोषिक मिळाले. तर बालनाट्य स्पर्धेत ‘रंग दे बसंती’ या नाटकाला सांघिक द्वितीय बक्षीस मिळाले. […]

उर्वरित वाचा

परकीय थेट गुंतवणुकीच्या निषेधार्थ मराठवाडा व्यापारी महासंघाचे मिसकॉल अभियान

केंद्र सरकारने परकीय थेट गुंतवणुकी संदर्भात स्वीकारलेल्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाच्यावतीने मिसकॉल अभियान राबविण्यात येणार असून जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले जाणार आहे. चेंबर ऑफ ऑल इंडिया महाराष्ट्र इंडस्ट्री ऍन्ड ट्रेडचे अध्यक्ष मोहन गुरूनाणी व अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांच्या आदेशावरून दि. २८ सप्टेंबर रोजी भारत व्यापार बंद पुकारण्यात आलेला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा […]

उर्वरित वाचा

9 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचे राज्यव्यापी आंदोलन, मराठा मोर्चाच्या लातूर बैठकीत निर्णय

मराठा आरक्षणप्रकरणी मराठा समाजाने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 9 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय मराठा मोर्चाच्या आज लातूर येथे आयोजित बैठकीमध्ये घेण्यात आला. मराठा समाज आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची राज्यस्तरीय बैठक आज लातूर येथे झाली. त्यावेळी या प्रतिनिधींनी सरकारविरोधात […]

उर्वरित वाचा

पंढरपूर येथील आषाढी एकादशी निमित्त रेल्वेच्या 12 विशेष गाड्या

दिनांक 23 जुलै 2018 रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त दक्षिण मध्य रेल्वे ने 12 विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. या पैकी नांदेड विभागातून 8 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्या पुढील प्रमाणे—- १.   गाडी संख्या 07501 / 07502  आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद (2 फेऱ्या) गाडी संख्या 07501 आदिलाबाद – पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक 22 जुलै, 2018 रोजी सकाळी 09.00 वाजता […]

उर्वरित वाचा

त्या मयताची ओळख पटली…रेल्वे पोलिस नागनाथ मुंडे यांचा मृतदेह असल्याची माहिती

परळी शहरापासून जवळच असलेल्या अंबाजोगाई रोडवरील सपना हाॅटेलच्या समोरील मोकळ्या जागेत आज रविवार दिनांक 24 रोजी सकाळी उदगीर येथे पोष्टींग असलेले रेल्वे काॕन्सटेबल बक्कल नंबर 376/ नागनाथ मुंडे या व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परळी पोलिस तपास करीत आहेत. याबाबत अधिक माहिती माहिती अशी की, गेल्या काही […]

उर्वरित वाचा

धस-जगदाळेची नव्हे तर ना.मुंडे बंधु-भगिणीची प्रतिष्ठा पणाला…

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. हि निवडणूक धस-जगदाळेची नव्हे तर ना.मुंडे बंधु-भगिणीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे . ख-या अर्थाने […]

उर्वरित वाचा

जी. श्रीकांत : तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी जी. श्रीकांत यांचा तिकिट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर या पदापर्यंत झालेला प्रवास अत्यंत प्रेरणादायी असाच आहे. जाणून घेऊ या त्यांचा प्रवास कसा होत गेला, ते कसे घडत गेले आणि अधिकारी झाल्यावर त्यांनी कशा उर्मीने कामाला सुरुवात केली याविषयी… जी.श्रीकांत यांचा जन्म कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील जवलगेरा या अत्यंत दुर्गम आणि मागासलेल्या […]

उर्वरित वाचा