पंढरपूर येथील आषाढी एकादशी निमित्त रेल्वेच्या 12 विशेष गाड्या

दिनांक 23 जुलै 2018 रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त दक्षिण मध्य रेल्वे ने 12 विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. या पैकी नांदेड विभागातून 8 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्या पुढील प्रमाणे—- १.   गाडी संख्या 07501 / 07502  आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद (2 फेऱ्या) गाडी संख्या 07501 आदिलाबाद – पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक 22 जुलै, 2018 रोजी सकाळी 09.00 वाजता […]

उर्वरित वाचा

जी. श्रीकांत : तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी जी. श्रीकांत यांचा तिकिट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर या पदापर्यंत झालेला प्रवास अत्यंत प्रेरणादायी असाच आहे. जाणून घेऊ या त्यांचा प्रवास कसा होत गेला, ते कसे घडत गेले आणि अधिकारी झाल्यावर त्यांनी कशा उर्मीने कामाला सुरुवात केली याविषयी… जी.श्रीकांत यांचा जन्म कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील जवलगेरा या अत्यंत दुर्गम आणि मागासलेल्या […]

उर्वरित वाचा

बाजार समितीच्या सभापतींनी केले मतदान!

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या मतदारसंघाच्या निवडणूकीची घोेषणा झाल्यापासून सतत काहीना काही नाट्यमय घडामोडी घडत गेल्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चीली गेलीये. भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदारकीचे तिकीट मिळविलेले रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात खुप मोठा गोंधळ उडाला होता. तद्नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले अशोक […]

उर्वरित वाचा

उस्मानाबाद, लातूर येथे 100 तर बीड जिल्ह्यात 99.72% मतदान!

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीकरिता आज दि.21 मे रोजी मतदान घेण्यात आले. अत्यंत चुरशीच्या आणि राज्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या या जागेवर कोण बाजी मारणार? ही उत्सुकता येत्या गुरुवारपर्यंत कायम असणार आहे. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडून अशोक जगदाळे यांना पुरस्कृत करण्यात आले होते तर भाजपाच्या वतीने सुरेश धस यांना […]

उर्वरित वाचा

परळीत नगराध्यक्षांनी केले मतदान

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेला आज सकाळी 8 वाजता कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली. प्रशासनाने या निवडणूक प्रक्रियेसाठी जय्यत पूर्वतयारी करून ठेवली होती. 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी 9.30 पर्यंत एकही मतदान झालेले नव्हते. आज दि.21 मे रोजी परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालय बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या मतदान […]

उर्वरित वाचा

भाजपकडून गोपनीयरीत्या नगरसेवकांची सहल!

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर दगा फटका होऊ नये यासाठी लातूर मनपातील भाजप नगरसेवकांची सहल काढण्यात आली आहे. या विषयी शहरात चर्चा सुरू होताच भाजप जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी हा अभ्यास दौरा असल्याची सारवासारव केली आहे. ‘झिरो टू हिरो’ झालेल्या मनपातील सत्ताधारी भाजपकडून गोपनीयरीत्या नगरसेवकांची सहल काढण्यात आली. लातूर मनपातील जवळपास ३२ भाजप नगरसेवकांना भाजपचे […]

उर्वरित वाचा

काँग्रेसचा श्री.अशोक जगदाळे यांना संपुर्ण पाठींबा – सौ.रजनीताई पाटील

राज्यातील आणि देशातील जातीयवादी शक्तींचा पराभव करण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढत आहेत. त्यामुळेच बीड-लातूर-उस्मानाबादच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री.अशोक जगदाळे यांना काँग्रेस पक्षाचा संपुर्ण पाठींबा असल्याची ग्वाही माजी खासदार तथा काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.रजनीताई पाटील यांनी दिली. तर आघाडीकडे पुर्ण बहुमत असल्यामुळे श्री.जगदाळे यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास विधान परिषद […]

उर्वरित वाचा

रमेश कराड यांच्यावर पक्ष कारवाई करणार; ना.धनंजय मुंडे यांचे संकेत

विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारे रमेश कराड सध्या राष्ट्रवादीतच आहेत. पक्ष त्यांच्याबाबत विधानपरिषद निवडणुकीनंतर योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी दिली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यांना विधानपरिषदेचं तिकीटही […]

उर्वरित वाचा

सुरेश धस व रमेश कराड यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ!

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीने आता चांगलाच जोर पकडला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कडून प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुढे आहे. आज भाजपचे उमेदवार श्री सुरेश धस यांनी नाराज रमेश कराड यांची त्यांच्या लातूरातील प्रयाग या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रमेश कराड यांनी धस यांचा ज्ञानेश्वर माउलींची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. […]

उर्वरित वाचा

आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे चांगल्या मताने निवडून येतील – श्री दिलीपराव देशमुख

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून पुन्हा मीच निवडणूक लढवावी असा दोन्ही पक्षाचा आग्रह केला होता, मात्र माझी यावेळी इच्छा नव्हती . 18 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सहकार्य केले त्याची परतफेड करण्यास यावेळी काँग्रेस उत्सुक आहे त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील काँग्रेसचे एकही मतदान आघाडीच्या उमेदवाराशिवाय इतरांना जाणार नाही आणि अशोक जगदाळे चांगल्या मतांनी विजयी होतील असा […]

उर्वरित वाचा