हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे –ना.धनंजय मुंडे

पीक कर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने शेतक-याच्या पत्नीकडे केलेली शरीरसुखाची मागणी, ही बातमी ऐकुण तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अशा सरकारचा कडेलोट केला पाहीजे, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे.  हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे. अशा शब्दात विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलच फैलावर घेतले आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल […]

उर्वरित वाचा

फार्मसिस्टला मिळाला  पाहिजे स्वस्त पर्यायी औषधे देण्याचा अधिकार-कैलास तांदळे

फार्मसिस्टला मिळाला  पाहिजे स्वस्त पर्यायी औषधे देण्याचा अधिकार ; डॉक्टर फक्त ब्रॅन्डेड औषधेच लिहून देत असतील तर रुग्णांना संबधित ब्रॅण्डच्या औषधांना पर्याय म्हणून जेनेरिक औषधे लिहून देण्याचे अधिकार औषधविक्रेत्यांना द्यावेत, अशी मागणी औषधविक्रेत्यांच्या संघटनांनी केली आहे. जेनेरिक औषधांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत. मेडिकल स्टोअरमध्ये वेगळे शेल्फ ठेवावे असेही सांगितले आहे. […]

उर्वरित वाचा

वृद्धपकाळ निवृत्ती वेतनात वाढ करण्यास शासन सकारात्मक -ना. पंकजाताई मुंडे

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत 400 रुपये तर केंद्र शासनामार्फत 200 रुपये असे एकूण 600 रुपये वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळते. या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यास शासन सकारात्मक आहे, असे ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. केंद्र सरकार पुरस्कृत ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी, प्रगती व संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता […]

उर्वरित वाचा

पांडूरंग फुंडकर यांच्या निधनाने भाजपाचे मोठे नुकसान – ना. पंकजाताई मुंडे 

कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर हे पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते होते, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्ष संघटनेचा विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ मार्गदर्शन हरपला असून भाजपचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी फुंडकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. मुंडे-फुंडकर यांच्यातील कौटूंबिक […]

उर्वरित वाचा

ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश हरभरा खरेदीस 13 जुन पर्यंत मुदतवाढ

राज्यात खरेदी न झालेल्या आणि फक्त नोंदणी झालेल्या तुर, हरभरासाठी प्रति क्विंटल 1 हजार रूपये अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली असली तरी ही घोषणा फसवी असुन त्याऐवजी  शासकिय खरेदी न झालेल्या शेतकर्‍यांकडील सर्व तुर, हरभर्‍यासाठी बाजार भाव व हमीभावातील फरकाची रक्कम शासनाने द्यावी अशी मागणी ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते […]

उर्वरित वाचा

ना पंकजाताई मुंडे यांच्यामुळे बचतगटांना मिळाली नवीन उद्योगाची संधी

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असणा-या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मतदारसंघातील बचतगटांना नवनवीन उद्योगाची संधी प्राप्त करून दिली आहे. बंजारा आर्टनंतर परळीतील महिलांना त्यांनी आता ज्यूट बॅग व त्यावरील कलाकुसरीचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे, विविध गावांतील वीस महिलांनी या प्रशिक्षणाचा नुकताच लाभ घेतला. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्र […]

उर्वरित वाचा

ना.पंकजाताई यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव

नवभारत दैनिकाच्या वतीने मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे आयकाॅनिक इन्स्पायरेशनल वुमन ऑफ नवभारत या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत व उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले. महिला बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, नवभारतच्या संचालिका अनुपमा माहेश्वरी, स्वाती वाधवानी, महिला सनदी अधिकारी श्वेता सिंघल आदी मान्यवर […]

उर्वरित वाचा

रमेश कराड यांच्यावर पक्ष कारवाई करणार; ना.धनंजय मुंडे यांचे संकेत

विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारे रमेश कराड सध्या राष्ट्रवादीतच आहेत. पक्ष त्यांच्याबाबत विधानपरिषद निवडणुकीनंतर योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी दिली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यांना विधानपरिषदेचं तिकीटही […]

उर्वरित वाचा

साखर उद्योगासमोरील अडचणी सोडविताना शेतक-यांचे नुकसान होवू नये -ना.पंकजाताई मुंडे

पावसाचे प्रमाण, ऊसाचे उत्पादन आणि साखरेच्या दरातील चढ उतार आदींमुळे साखर उद्योगासमोरील अडचणी वाढल्या असल्या तरी यात सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान होता कामा नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी असे मत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा साखर संघाच्या संचालिका ना. पंकजाताई मुंडे यांनी बैठकीत व्यक्त केले. नॅशनल को-ऑप. शुगर फॅक्टरीज फेडरेशन […]

उर्वरित वाचा

मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा निर्णय

राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता) प्रलंबित रक्कम वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालय […]

उर्वरित वाचा